Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसैनिकांना 2 दिवसाची पोलीस कोठडी

पुणे : काल (दी. 2) पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली आहे. यामध्ये ठाकरे संजय मोरे,संभाजी थोरवे, राजेश पळसकर,चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांचा समावेश आहे. अटक केल्यानंतर पोलीस त्यांना पुणे न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

आजची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आरोपींचे वकील विजयसिंह पाटील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. विजयसिंह पाटील म्हणाले, फिर्यादींच्या वकिलांतर्फे आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडी सुनवावी, अशी मागणी केली. पण आम्ही त्यावेळी कोर्टात म्हणालो, यावेळी उद्या सामंत यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी संजय मोरे ,गजानन थरकुडे, किंवा शिवसेनेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. तरीही आरोपींवर खोटा गुन्हा दाखल करून. त्यांना पोलिसांनी अटक केली. असा आम्ही कोर्टात युक्तिवाद केला. त्यामुळे आठ दिवसाची पोलीस कोठडी नाकारुन दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अशी माहिती आरोपींची वकील विजयसिंह पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading