fbpx

अमरदीप घोडके, आकाश टक्काळ, अनिल कुमार, रोहन कोठारे, आशुतोष पाध्ये, सुमित अहुजा यांची आगेकूच !!

स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा २०२२ !
 
पुणे : द क्यु क्लब तर्फे आयोजित स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत ( Sterlite Tech All India Open Snooker Championship 2022) अमरदीप घोडके, आकाश टक्काळ, अनिल कुमार, रोहन कोठारे, आशुतोष पाध्ये, सुमित अहुजा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीकडे आगेकूच केली.

वडगांव-शेरी येथील द क्यु क्लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या चुरशीच्या झालेल्या सामन्यात अमरदीप घोडके याने एमडी सलमान याचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्याची पहिली फ्रेममध्ये सलमानने ४३-३५ अशी जिंकली. दुसरी फ्रेम अमरदीपने ६९-६२ अशी जिंकत १-१ अशी बरोबरी केली. तिसरी फ्रेम ७४-३६ अशा गुणफरकाने जिंकत अमरदीपने २-१ अशी आघाडी घेतली. चौथ्या फ्रेममध्ये सलमाने याने सामन्यात मुसंडी मारताना ६८-१३ गुणांसह २-२ अशी बरोबरी साधत चुरस निर्माण केली. निर्णायक आणि अंतिम फ्रेममध्ये दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक गुणांसाठी जोरदार प्रयत्न केले. पण केवळ ४ गुणांच्या फरकाने अमरदीपने ७२-६८ असा जिंकत सामना ३-२ असा जिंकला.

आकाश टक्काळ याने अभिजीत रानाडे याचे आव्हान ५८-२९, ४८-४२, १५-५४, ५२-४४ असे संपुष्टात आणून स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविला. अनिल कुमार याने अभिषेक बोरा याचा ५६-२९, ५२-३२, ६७-१८ असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला. रोहन कोठारे याने साहील डागा याचा ४३-५३, ६६-४१, ६५-५१ असा एकतर्फी पराभव केला.

आशुतोष पाध्ये याने अक्षय तलवानी याचा १३-५६, ६१-१९, ७४-३८, ५६-१५ असा पराभव करून मुख्य फेरीकडे वाटचाल केली. एकतर्फी झालेल्या सामन्यात सुमित अहूजा याने कार्तिक दिवेदी याचा ७६-०५, ७५-१६, ६४-०८ असा सरळ फ्रेममध्ये पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा निकालः पात्रता फेरीः
अमरदीप घोडके वि.वि. एमडी सलमान ३५-४३, ६९-६२, ७४-३६, १३-६८, ७२-६८;
आकाश टक्काळ वि.वि. अभिजीत रानाडे ५८-२९, ४८-४२, १५-५४, ५२-४४;
अनिल कुमार वि.वि. अभिषेक बोरा ५६-२९, ५२-३२, ६७-१८;
रोहन कोठारे वि.वि. साहील डागा ४३-५३, ६६-४१, ६५-५१;
आशुतोष पाध्ये वि.वि. अक्षय तलवानी १३-५६, ६१-१९, ७४-३८, ५६-१५;
सुमित अहूजा वि.वि. कार्तिक दिवेदी ७६-०५, ७५-१६, ६४-०८;

Leave a Reply

%d bloggers like this: