fbpx

खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची कारवाई

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीकडून चौकशी आणि छापेमारी सुरू असताना संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

“आपण शिवसेना सोडणार नाही”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केली आहे. “खोटे प्रकरण आणि खोटी कारवाई सुरू असून मरेन पण शरण जाणार नाही”, असेही त्यांनी म्हटले. तसेच “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.” असेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याची माहिती आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: