Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

देशात परिवर्तन करण्याची शक्ती युवकांमध्ये : बी. व्हि. श्रीनिवास


पिंपरी : देशात परिवर्तन करण्याची शक्ती युवकांमध्येच आहे. २०१४ पासून केंद्रात आलेल्या भाजपा सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, महागाई मध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये याविषयी तीव्र असंतोष आहे. सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यांना “मदतीचा हात चोवीस तास” या उपक्रमातून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मदत करावी. “माझा गाव माझी शाखा” या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने पिंपरी, काळेवाडी, विजयनगर आणि वाकड शाखेचे आज उद्घाटन झाले आहे. त्याप्रमाणे सर्व वॉर्ड मध्ये, वाडी वस्तीवर युवक काँग्रेसच्या शाखा सुरू करून नागरिकांशी संवाद साधून त्यांना काँग्रेसची विचारधारा सांगा. या उपक्रमातील उत्कृष्ट शाखांना दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तुम्ही संघटनेत काम करत रहा, संघटना तुमच्या कार्याची नोंद नक्कीच घेत असते. ह्याचे उदाहरण मी स्वतः आहे. मी काम करत राहिलो आणि माझ्या कामाची पावती म्हणून मला पक्षाने युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष बनविले. ज्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्हि. श्रीनिवास यांनी केले.

पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व विधानसभा अध्यक्ष यांची आढावा बैठक शुक्रवारी (दि. २९ जुलै) पिंपरी चिंचवड येथील हॉटेल रागा पॅलेस येथे झाली. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावारू आणि भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास,  विश्वजित कदम,  पृथ्वीराज साठे,  मितेंद्र सिंग,  प्रतिमा मुदगल, वंदना बेन, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत,  तनवीर विद्रोही,   शिवराज मोरे, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम,   सचिन साठे, गौतम आरकडे, प्र  अनिकेत नवले , अनिकेत अरकडे ,शहर युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष सायली नढे
आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बी. व्ही. श्रीनिवास यांनी ‘गाव तिथे शाखा’ या युवक काँग्रेसच्या महत्वकांक्षी उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावारू मार्गदर्शन करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला स्वाभिमानी महाराष्ट्र. कधीही इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकर विचारधारेचे समर्थन करणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी तयारी करावी. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या ‘मिशन १०००’ या उपक्रमांतर्गत उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यरत आहे असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावारू यांनी केले .

प्रास्ताविक प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. शिवराज मोरे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी स्वागत, गौरव चौधरी यांनी सूत्रसंचालन तर युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव डॉ. वैष्णवी किराड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading