Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही. त्यांनी मराठी माणसाला जाणीव करून दिली -अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुबंईसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा विरोधाकांकडून निषेध केला जात आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी  राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही.मी त्याचं समर्थन करतो. अशी प्रतिक्रिया पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले,राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही. राज्यात दोघेजण वक्तव्य करतात. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे राज्यापाल कोश्यारी. यातील फडणवीस यांचे कोणतही वक्तव्य हे स्वत:साठी असते त्यामुळे पक्षासाठी कुणी वक्तव्य करणारं असं महाराष्ट्रात नाही. त्यामुळे ती भूमिका राज्यपाल करत आहेत, असं म्हणत त्यांनी राज्यपालांचे समर्थन आणि फडणवीसांचे कान टोचले आहेत.

विरोधकांकडून होणाऱ्या प्रतिक्रिया संदर्भात विचारले असता आंबेडकर म्हणाले, राज्यापालांची उचलबांगडी कशासाठी? त्यांनी हे वक्तव्य करुन मराठी माणसाला इशारा दिला आहे. येथील व्यापार हा राजस्थानी आणि गुजराती लोकांच्या हाती आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला झाला आहे. कारण इतकी वर्ष राज्य आणि सत्ता असूनही त्यांनी मराठी माणसाच्या हाती आर्थिक व्यवहार न देता ते राजस्थानी आणि गुजराती लोकांकडे दिले. त्यामुळे राज्यपालांनी याची जाणीव करुन दिली आहे. त्यामुळे मराठ्यांनी आता ठरवले पाहीजे की, या भुजगावण्यांसोबत रहायचे की नवीन नेतृत्व तयार करायच.असंही प्रकाश आंबेडकर यांनी सुचवलं आहे. 

राज्यपाल कोश्यारींचा हा टोला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षातील मराठी नेत्यांना आहे. तुम्ही इतकी वर्ष राज्य करुनही मराठी लोकांच्या हाती व्यवहार येऊ दिलेले नाहीत. आजही हे व्यापार गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हाती आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा कोणताही अपमान झालेला नाही. कारण राज्यपाल कोश्यारींनी सत्य परिस्थिती मांडली आहे, असंही प्रकाश आंबडेकरांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading