Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सावरासावर

मुंबई : मुंबईतून जर गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अशात आता राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक असल्याचं आता त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.

कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading