fbpx

सारंग धारणे या तरुणांने उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट काढून दिल्या शुभेच्छा

पुणे:नेत्याच्या वाढदिवसाला कार्यकर्ते काय काय करतील त्याचा अंदाज आपण लावू शकत नाही. पुण्यातीलच असा एक कार्यकर्ता याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या रक्ताने काढून त्यांना वाढदिवसाची भेट दिलेली आहे..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काल वाढदिवस होता शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे झालेल्या दुःखाचे आणि राजकीय संकटाचे सावत्या वाढदिवसावर आहे अशातच उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की मला भेट वस्तू आणि पुष्पगुच्छ नको तर प्रतिज्ञापत्र द्या या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे चा यंदाचा वाढदिवस महत्त्वाचा असणार असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या परंतु असेच एक वेगळी संकल्पना राबवत आपल्या लाडक्या नेत्याला ते स्वतःच्या रक्ताने फोटो काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले नेते आपण किती कट्टर आहोत हे इतरापेक्षा वेगळे करून दाखवला आहे
धनकवडी बालाजी नगर मधील कट्टर शिवसैनिक सारंग धारणे या तरुणांने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे रक्ताने पोर्ट्रेट काढून ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्यानंतर त्याची चर्चा होत आहे.
उद्धव ठाकरे च्या वाढदिवसा दिवशी सारंग धारणे यांचाही वाढदिवस आहे त्याचेही बॅनर धनकवडी बालाजी नगर भागात लागले होते .परंतु आपल्या नेत्याप्रती आपण किती कट्टर आहोत हे दाखवण्यासाठी त्याने उद्धव ठाकरेंचे आपल्या स्वतःच्या रक्ताने कोर्टात काढून त्यांना भेट म्हणून मातोश्रीवर दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: