fbpx

पदवीबरोबर कौशल्ये विकसित करा – डॉ. दीपक शिकारपूर

पुणे  – पदवी संपादन करताना यशस्वी करिअरसाठी आवश्यक असणारे कौशल्य आत्मसात करा, असा सल्ला संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी दिला.
डीईएसच्या बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिकारपूर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. प्राचार्या डॉ. सीमा पुरोहीत, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, कार्यवाह सुहास पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिकारपूर म्हणाले, ‘पदवीच्या पहिल्या वर्षी जीवनात आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करावी. दुसर्‍या वर्षी इंग्रजीवर प्रभुत्व आणि एखादी परकीय भाषा शिकणे आणि तिसर्‍या वर्षी नोकरी-व्यवसायासाठी उद्योजकता विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे उपयुक्त ठरते.’

Leave a Reply

%d bloggers like this: