मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी अर्चना पाटील यांना विजयी करा; मल्हार पाटील यांचे आवाहन
धाराशिवः लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराणे वेग घेतला आहे. देशासह मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन युवानेते मल्हार पाटील यांनी केले.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ युवानेते पाटील यांनी परंडा शहराचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. तसेच सुफीसंत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन यांच्या दर्गाहला फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी मुजावर समाजाच्या वतीने पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी भाषणात बोलताना महायुतीच्या उमेदवार पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली.
महायुती सरकारच्या कार्यकाळात राणा दादांनी आपल्या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. मात्र केंद्रातील विकास निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार असणे गरजेचे आहे.. म्हणूनच सर्वांनी ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे अशी विनंती मल्हार पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, माजी सभापती गौतम लटके, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, अण्णासाहेब देशमुख, राजकुमार पाटील, मतीन जिनेरी, वाजीद दखणी, सरफराज कुरेशी, संजय घाडगे, तनवीर मुजावर, जावेद पठाण, सलीम हन्नुरे, वैभव पवार, शरीफ तांबोळी, दत्ता रणभोर, बालाजी नेटके, बच्चन गायकवाड, रत्नकांत शिंदे, तय्यब शेख, धनाजी जाधव, खाजा बागवान, गोवर्धन शिंदे, नासेर शेख, सुरेश काशीद, धीरज ठाकूर आदीसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
