fbpx

राकेश बेदी म्‍हणतात, ‘शुभांगी अत्रे मुलीप्रमाणे माझी काळजी घेते’

एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये भूरेलालची भूमिका साकारणारे राकेश बेदी यांनी त्‍यांच्‍या चार दशकांच्‍या अभिनय करिअरदरम्‍यान अनेक विनोदी भूमिका साकारल्‍या आहेत. त्‍यांनी १९८०, १९९० व २०००च्‍या दशकांमध्‍ये विनोदी टेलिव्हिजन मालिका व चित्रपटांमध्‍ये प्रभुत्‍व गाजवले. आपली अद्वितीय प्रतिभा, दृढ विश्‍वास व कौशल्‍यासह राकेश बेदी यांनी सतत अप्रतिम परफॉर्मन्‍स सादर केले आहेत, ज्‍यामधून प्रेक्षक त्‍यांच्‍यावर विश्‍वास ठेवण्‍यास प्रेरित झाले. मालिकेमधील त्‍यांची भूमिका भूरेलालने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असताना ते त्‍यांची विनोदीशैली, मालिका ‘भाबीजी घर पर है’चे दिग्दर्शक व कलाकारांसोबत असलेले त्‍यांचे समीकरण अशा विविध विषयांबाबत सांगत आहेत.
आम्‍हाला आतापर्यंतच्‍या तुमच्‍या प्रवासाबाबत सांगा.
मी अधिकृतरित्‍या चित्रपटामध्‍ये करिअर सुरू करण्‍यापूर्वी पुण्‍यामध्‍ये माझा एफटीआयआय कोर्स पूर्ण केला आणि माझ्या कॉन्‍वोकेशन परफॉर्मन्‍सदरम्‍यान सुपरहिट चित्रपट ‘शोले’चे दिग्‍दर्शन केलेले जी.पी. सिप्‍पी सर यांनी मला मुंबईला येण्‍यास सांगितले आणि मला चित्रपट ‘एहसास’मध्‍ये लक्षणीय भूमिका ऑफर केली. या चित्रपटासह मी हिंदी चित्रपटसृष्‍टीमध्‍ये प्रवेश केला. माझा हा प्रवास उत्‍साहपूर्ण राहिला आहे आणि मला सांगताना अभिमान वाटतो की १०० हून अधिक चित्रपट व टेलिव्हिजन मालिकांमध्‍ये काम केले असताना देखील मी रंगभूमीसह करिअरला सुरूवात केलेल्‍या काही कलाकारांपैकी एक आहे आणि आजही रंगभूमीशील संलग्‍न आहे. रंगभूमी हे नेहमीच माझे पहिले प्रेम असेल.
रंगभूमी कलाकार म्‍हणून तुमचे रोल मॉडेल कोण राहिले आहेत?
माझे चार्ली चॅ‍पलिनवर क्रश होते, म्‍हणून मी त्‍यांचे सर्व चित्रपट आणि विनोदी परफॉर्मन्‍स पाहिले. त्‍यांनी एकही संवाद न म्‍हणता सर्वांना हसवून-हसवून लोटपोट केले आणि याच बाबीने मला रंगभूमीमध्‍ये करिअर सुरू करण्‍यास प्रेरित केले. मला जॉनी वॉकर, संजीव कपूर आणि मेहम्‍मूद सर यांचे अभूतपूर्व काम देखील आवडले.
मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये भूरेलालची भूमिका साकारण्‍यासाठी कसा प्रतिसाद मिळाला आहे?
प्रतिसाद अत्‍यंत उत्तम मिळाला आहे. भूरेलाल व्‍यक्तिमत्त्व अत्‍यंत लोकप्रिय आहे. पण मी माझा हेल्‍मेट काढल्‍यानंतर काहीसी चिंता देखील वाटते (हसतात). प्रेक्षक मला भूरेलालच्‍या भूमिकेसाठी दाद देतात, तेव्‍हा मला खूप आनंद होतो. मी भूरेलालने सोशल मीडियावर निर्माण केलेले अनेक विनोदी व विलक्षण सास-याचे मीम्‍स आठवल्‍यानंतर गालातल्‍या गालात हसतो.
तुमच्‍या मते मालिका ‘भाबीजी घर पर है’ला इतर विनोदी मालिकांच्‍या तुलनेत सर्वात लोकप्रिय मालिका बनवणारी बाब कोणती?
माझ्या मते लेखन. त्‍याबाबत शंकाच नाही! आमचे लेखक मनोज संतोषी कोणताही विनोद नसलेल्‍या संवादांसह प्रेक्षकांच्‍या चेह-यांवर हास्‍य आणू शकतात. आम्‍हाला फक्‍त हास्‍य आणू शकणा-या पद्धतीने संवाद म्‍हणावा लागतो.
तुम्‍ही या क्षेत्रामध्‍ये दीर्घकाळापासून आहात आणि अनेक विनोदी व गंभीर भूमिका साकारल्‍या आहेत. पण प्रेक्षक तुम्‍हाला अधिककरून तुमच्‍या विनोदी भूमिकांसाठी ओळखतात. याबाबत तुमचे मत काय आहे?
प्रेक्षक माझ्या कामाचे कौतुक करण्‍यासोबत खूप पाठिंबा देत आहेत, ज्‍याबाबत मी त्‍यांचा ऋणी आहे. मी एकाच वेळी गंभीर व विनोदी अशा दोन्‍ही भूमिका साकारल्‍या आहेत आणि मी तसे करत राहिन. रंगभूमीवर मी अनेक गंभीर भूमिका साकारल्‍या आहेत. त्‍यापैकी सर्वात सुप्रसिद्ध म्‍हणजे ‘द माऊस ट्रॅप बाय अगथ ख्रिस्‍ती’, ज्‍यामध्‍ये मी नाटकामधील प्रमुख पात्राची भूमिका साकारली. मी २०० किंवा त्‍यापेक्षा अधिक कॉन्‍सर्टसमध्‍ये परफॉर्म केले आहे आणि ते लंडनमध्‍ये सुपरहिट ठरले. तसेच विजय तेंडुलकर यांची कलाकृती ‘मेसेज’मध्‍ये मी एकट्याने सलग दोन तास व्‍यक्तिमत्त्वांच्‍या २४ विविध छटा साकारल्‍या आहेत, जे नेहमीच माझ्या आवडीचे राहिल.
तुमच्‍या जीवनात सतत कोणाचा पाठिंबा राहिला आहे?
माझ्या सर्व चढ-उतारादरम्‍यान माझे कुटुंब नेहमीच पाठिशी राहिले आहे, विशेषत: माझी पत्‍नी आणि दोन मुलींनी खूप पाठिंबा दिला आहे.
तुम्‍ही आणि आसिफ शेख यांनी यापूर्वी देखील सह-कलाकार म्‍हणून एकत्र काम केले आहे. हे समीकरण तुम्‍हाला सीन्‍स विनोदासह साकारण्‍यास मदत करते का?
प्रत्‍येक वेळी माझे सीन असताना मी सेटवर खूप धमाल करतो. आम्‍ही दोघांनी एकत्र अनेक नाटक, चित्रपट व रंगमंचावरील नाटकांमध्‍ये काम केले आहे. आसिफला मी इतका आवडतो की, आम्‍ही तालीम करताना आमच्‍या गतकाळातील अनुभवांबाबत विनोद करतो. खूपवेळा भूरे व विभुती एकत्र ड्रिंक करतात आणि पात्रांची विलक्षण कृत्‍ये मनोरंजनपूर्ण आहेत.
आसिफ शेख यांच्‍याव्‍यतिरिक्‍त मालिका ‘भाबीजी घर पर है’च्‍या कोणत्‍या कलाकारासोबत तुमचे प्रबळ नाते आहे?
माझे सीन्‍स नियमित नसतात, पण मी सेटवर जातो तेव्‍हा शुभांगी अत्रे (अंगूरी भाभी) माझी खूप काळजी घेते. ती माझी मुलीप्रमाणे काळजी घेते. म्‍हणून आमच्‍यामधील नाते फक्‍त पडद्यावर नसून पडद्यामागे देखील दृढ आहे. मी सेटवर असताना आम्‍ही सर्व एकत्र लंचचा आस्‍वाद घेतो. शुभांगी स्‍वत: माझ्यासाठी जेवण बनवते आणि निरागसपणे म्‍हणते ‘दादू खाना खा लो’. तसेच माझे रोहितसोबत देखील चांगले जमते, आम्‍ही आमचे रंगभूमीवरील दिवस आणि अनेक राजकीय विषयांबाबत गप्‍पागोष्‍टी करतो.
मालिका ‘भाबीजी घर पर है’च्‍या चाहत्‍यांना एखादा संदेश?
जीवनात प्रत्‍येकाने हसत राहिले पाहिजे. हास्‍यामधून एकाच वेळी खूप गोष्टी साध्य होतात आणि कोणताही संदेश सांगू शकणा-या ब-याच गोष्‍टी व्‍यक्‍त होतात.

Leave a Reply

%d bloggers like this: