छत्रपती व्यंकोजीराजे यांचे वंशज बाबाराजे भोसले यांची शिवसृष्टीला सदिच्छा भेट
पुणे : श्रीमंत शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र आणि कर्नाटक संस्थानचे तंजावरचे छत्रपती व्यंकोजीराजे यांचे वंशज असलेल्या बाबाराजे भोसले यांनी आज पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट दिली. शिवसृष्टीचे विश्वस्त विनीत कुबेर यांचे हस्ते माननीय छत्रपती बाबाराजे भोसले यांचा सन्मान करण्यात आला. शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद साळुंखे, अभियंते विलास कोळी आणि सीए एस के रमण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टीमधील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाबाराजे भोसले यांनी छत्रपतींना मानवंदना दिली. याबरोबरच महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने साकारत असलेल्या शिवसृष्टीतील कामांची पाहणी करीत अत्यंत समाधान व्यक्त केले.
