Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Big News : बारामती पोटनिवडणुकीतून लक्ष्मण हाके यांची माघार


बारामती  : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली असून ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बारामतीत बिनविरोध निवडणुकीची शक्यता वाढली आहे.
प्रा. हाके बारामतीत दाखल झाल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री धनंजय मुंडे तसेच नेते किरण गुजर यांनी त्यांची भेट घेतली. या बैठकीत हाके यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करू नये, अशी विनंती करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही दूरध्वनीवरून हाके यांच्याशी संपर्क साधत त्यांना निवडणुकीपासून दूर राहण्याची विनंती केली होती.
वरिष्ठ नेत्यांचा मान राखत आणि राजकीय समन्वयाच्या भूमिकेतून प्रा. हाके यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
बारामती मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असल्याने या घडामोडीकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading