fbpx

लीडकडून लहान शहरातील विद्यार्थ्‍यांना सीबीएसई इयत्ता १०वी यशासाठी दिला मदतीचा हात

पुणे : भारतभरातील लीड-संचालित शाळांसाठी अभिमानास्‍पद क्षण ठरला आहे. २०२२ च्‍या बॅचमधील इयत्ता १०वी च्‍या विद्यार्थ्‍यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेमध्‍ये सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी करत सर्व विक्रम मोडून काढले आहेत. कोविडच्‍या प्रादुर्भावामुळे अध्‍ययनाचे नुकसान झाले असताना देखील विद्यार्थ्‍यांनी वर्षाच्‍या सुरूवातीपासून बोर्ड परीक्षेच्‍या निकालांपर्यंत प्रशंसनीय २३ टक्‍क्‍यांची वाढ दाखवली. लीडच्‍या शिस्‍तबद्ध क्‍लास १० यंत्रणेमुळे हे शक्‍य झाले. ही यंत्रणा संकल्‍पना स्‍पष्‍ट करण्‍यासोबत सखोल सराव आणि वेळेवर उपचारात्‍मक शिक्षण देते. तसेच भारतातील लीडच्‍या १५ विद्यार्थ्‍यांनी किमान एका विषयामध्‍ये १०० टक्‍के गुण मिळवले आहेज्‍यामध्‍ये महाराष्‍ट्रातील खेड शिवापूर येथील फ्लोरा व्‍हॅली स्‍कूलची विद्यार्थीनी अदिती समलने गणित विषयामध्‍ये १०० टक्‍के गुण मिळवले आहेत आणि १२७ लीड विद्यार्थ्‍यांनी ९० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

लीडचे सह-संस्‍थापक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्‍हणाले, ”लीड सीबीएसई इयत्ता १०वी च्या २०२२ बॅच विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! या विद्यार्थ्यांनी मिळवलेली अध्‍ययन वाढ आणि सर्वोत्‍कृष्‍ट निकाल सत्‍यापित करतात कीलीड सारख्या शालेय प्रणालींसह भारतातील लहान शहरांमधील विद्यार्थी देखील महानगरांमधील त्यांच्या सह-विद्यार्थ्‍यांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.”    

गुणवत्ताधारक अदिती समलम्हणाली, “बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्‍न असते! मी माझे पालकमाझे शिक्षक आणि लीड प्रणाली यांच्‍या पाठिंब्‍यासह माझे स्‍वप्‍न साकारण्‍यामध्‍ये यशस्‍वी झालो आहे. लीड प्रणालीमध्ये कठोर मॉक ड्रिल आणि ब्रिज कोर्सचा समावेश आहेआणि यामुळे मला सर्व संकल्पना व विषय उत्तमप्रकारे समजण्‍यास मदत झाली आहे. करमाळा येथील लीड स्‍कूलचा विद्यार्थी असल्याचा मला आनंद झाला आहे आणि माझी आणखी शिकण्याची अपेक्षा आहे!

खेड शिवापूर येथील फ्लोरा व्‍हॅली स्‍कूलचे शाळामालक व संचालक डॉ. अतुल पडाळकर म्‍हणाले, “२०२२ सीबीएसई इयत्ता १०वी बोर्ड परीक्षेत चांगली कामगिरी केल्याबद्दल अदिती समलहिचा आम्हाला अभिमान आहे. लीडने आमच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे उत्तमप्रकारे ज्ञान देण्‍यासाठी आणि त्यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी गेल्‍या वर्षापासून पुरेशा उपचारात्मक सत्रांची खात्री घेतली आहे. लीडची एकात्मिकतपशीलवार अध्यापन-अध्‍ययन प्रणाली खात्री देते कीआमचे विद्यार्थी त्यांची संपूर्ण शैक्षणिक क्षमता प्राप्‍त करण्यास सक्षम आहेतजे बोर्ड परीक्षेच्या निकालांमधून दिसून येते.

Leave a Reply

%d bloggers like this: