दि विश्वेश्वर सहकारी बँकेचा सभासदांना 15% लाभांश
पुणे : दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे ची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी बोलताना बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी सांगितले की, मार्च 2022 अखेर बँकेच्या ठेवी ₹ 1631 कोटी असून, कर्जे ₹921 कोटी आहेत. एकूण व्यवसाय ₹ 2552 कोटी झाला आहे. बँकेचा CRAR 17.69% असून, बँकेचा सकल नफा ₹ 37.78 कोटी आहे. ऑडीट वर्ग A मिळाला आहे. बँकेने सभासदांना वर्ष 2020-21 साठी 8% व सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त 7% असा एकूण 15% लाभांश दिला केला आहे. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुरु करण्यात आलेली ‘Golden Jubilee’ 24 ते 30 महिन्यांसाठी 6% व्याजदर असलेली विशेष मुदत व रिकरिंग ठेव योजना सुरु केली आहे.
ज्येष्ठ संचालक सुनिल ना. रुकारी यांनी बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून, आणखी काही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत बँकेने अधिक चांगली व्यवसाय वाढ व सर्वोत्तम वसुली करण्याचा संकल्प केला आहे. या सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष सीए मनोज साखरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
