Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात शिंदे सरकार कायम रहावं – कालीचरण महाराज

पुणे : राज्यातील आलेले नवीन सरकार चांगले काम करत आहे की नाही या वर विविध नेत्यांनी व लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.शिंदे सरकार चांगलं काम करत आहेत. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले,उ स्मानाबादचे धाराशिव केले, खूप आनंद झाला, हिंदूंच्या अस्मितेचा विजय होत आहे, शिंदे सारखे राजा असणं गरजेचं आहे. शिंदे सरकार कायम रहावं. असे सरकार प्रत्येक प्रांतात असायला हवे. असे कालीचरण महाराज यांनी म्हटल आहे.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित म्हसोबा उत्सवात दीप अमावस्येला दीपोत्सव करण्यात आला. या कार्यक्रमानंतर कालीचरण महाराज बोलत होते. 

कालिचरण महाराज म्हणाले, शिंदे सरकारला माझा आशीर्वाद आहे.जे हिंदूत्ववादी सरकार आहे त्याला माझा आशीर्वाद, पाठींबा आहे.  शिवसेना ही कोणाचा आहे यावरून ठाकरे व शिंदे घाटामध्ये सध्या वाद सुरू आहे. ,शिवसेना कुणाचीही असो शिवाजी महाराज हिंदूंचे आहेत. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना पक्षातील आमदार व मंत्र्यांकडे लक्ष दिले नाही अशा प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदारांनी दिल्या आहेत. त्यावर कालिदासचरण महाराज म्हणाले,उद्धव ठाकरे यांना आता सल्ला देऊन काय फायदा, सल्ला देऊन आता काही उपयोग नाही. असे कालिदास चरण महाराज म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading