fbpx

महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे नायरा कंपनीच्या विभागीय कार्यालयात धरणे आंदोलन सुरू

पिंपरी : नायरा एनर्जी लि. (पूर्वीची Essar) च्या सर्व पंपधारकांचे विविध प्रलंबित मागण्यासाठी देशभरात आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रातील महापेट्रो डिलर्स असोसिएशन तर्फे ही नायरा (Essar) कंपनीच्या बाणेर येथील विभागीय कार्यालयात २५ जुलैपासून डिलर्सचे आंदोलन चालू आहे. जोपर्यंत कंपनी आमच्या मागण्या मान्य करीत नाही , तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा गुरुवारी ( दि. २८ जुलै) महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बाबर, सचिव राजकुमार मोरे यांच्यासह पदाधिकार्यांनी दिला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किंमती सरकारी कंपन्याप्रमाने समान असाव्यात, मालाचा पुरवठा सुरळीत करावा, मालाचा तुटवडा असताना डिलरच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, विक्रीत असणारे ‘टार्गेट’ बंद करावे, फाटा चार्जेस व इतर सर्व पेनल्टी त्वरित बंद कराव्यात, डिलर्सचे भांडवली व इतर खर्च खूप वाढले असताना अजून कमिशन वाढ झालेली नाही. कमिशन त्वरित वाढ करावी, री ब्रॅण्डिंगचा खर्च नायरा कंपनीने करावा, या डिलर्सच्या मागण्या असून कंपनी त्याकडे लक्ष देत नाही. कंपनीने प्रत्येकवेळी एकतर्फी निर्णय घेऊन डिलर्सचे मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे पेट्रोल पंपाचा व्यवसाय करणे खूपच अवघड होऊन बसले आहे व डिलर्स दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे, अशी माहितीही महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बाबर, सचिव राजकुमार मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिली.
आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी देशभरातील नायरा कंपनीच्या सर्व डिलर्सनी आंदोलन सुरू केले आहे. कंपनीच्या बाणेर येथील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विभागीय कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जितेंद्र यादव यांना महापेट्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बाबर, सचिव राजकुमार मोरे यांच्यासह रोहित जमतानी, सचिन नावंदर, रामकुमार सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: