fbpx

‘फॅन्‍स ऑफ स्‍कोडा’ उपक्रमाने स्‍कोडा ऑटो इंडियाला नेले ग्राहक सहभागाच्‍या नवीन शिखरावर

मुंबई – ग्राहक संलग्‍नता, ग्राहक समाधान व ग्राहक सहभाग यासंदर्भात लक्षवेधक उपक्रमाचा विचार करत स्‍कोडा ऑटोने क्रांतिकारी व धमाल ‘फॅन्‍स ऑफ स्‍कोडा’ मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम प्रत्‍यक्ष स्‍कोडा ग्राहकांना, तसेच ब्रॅण्‍डच्‍या चाहत्‍यांना समाविष्‍ट करण्‍यासोबत त्‍यांच्‍याशी संलग्‍न होते, जेथे स्‍कोडियन्‍स प्रत्‍यक्ष मोहिमा, इव्‍हेण्‍ट्स आणि उत्‍पादन लॉन्‍च यामध्‍ये सहभाग घेतात.

या प्रकल्‍पाबाबत बोलताना स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्‍ड संचालक झॅक होलिस म्‍हणाले, ”’फॅन्‍स ऑफ स्‍कोडा’ हा प्रकल्‍प माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. मी नेहमीच ग्राहकांसोबत परस्‍परसंवाद साधण्‍याचा आनंद घेतला आहे आणि हा उपक्रम आमच्‍या कार्स आवडणारे ग्राहक व चाहत्‍यांसोबतचा ब्रॅण्‍डचा सहभाग व संलग्‍नता अधिक वाढवेल. माझा विश्‍वास आहे की, या उपक्रमाने ग्राहक व चाहते समुदायाचे समाधान केले आहे, ज्‍यामुळे यशस्‍वी ब्रॅण्‍ड आणि प्रतिष्ठित ब्रॅण्‍ड यामध्‍ये मोठा फरक दिसून येतो. ‘फॅन्‍स ऑफ स्‍कोडा’सोबत आमचे नेटवर्क विस्‍तारीकरण आणि वाढलेले ग्राहक टचपॉइण्‍ट्स हे स्‍कोडामध्‍ये आम्‍हा सर्वांना ग्राहकांसोबत अधिक दृढ संबंध निर्माण करण्‍यास मदत करतात.”

‘फॅन्‍स ऑफ स्‍कोडा’ उपक्रमांतर्गत स्‍कोडा अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्‍वर, चंदिगड, चेन्‍नई, कोईम्‍बतूर, दिल्‍ली, गुवाहाटी, इंदौर, जयपूर, कोची, कोलकाता, नोएडा आणि सुरत येथे १५ ग्राहक उपक्रम राबवणार आहे. ग्राहक सहभाग व ग्राहक समाधानासाठी ही क्रांतिकारी मोहिम २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये स्‍कोडा ऑटो इंडियासाठी काही अविश्‍वसनीय यश व रेकॉर्ड-ब्रेकिंग विक्रीमुळे शक्‍य झाली आहे, जेथे कंपनीने २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीत २०२१ च्‍या वार्षिक विक्रीला मागे टाकले आणि देशामध्‍ये २०५ हून अधिक ग्राहक टचपॉइण्‍ट्सचा टप्‍पा पार केला.

स्‍कोडा ग्राहक सहभागासाठी https://www.skoda-auto.co.in/other-offerings/fansofskoda येथे नोंदणी करू शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: