fbpx

महापालिकेने प्लास्टिकचे साहित्य जप्त करत 9 लाख 70 हजार रुपये दंड वसुल केला

पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेने 1 जुलैपासून शहरातील प्लास्टिक बंदीवरील कारवाई अधिकच तीव्र केली आहे. मागील 25 दिवसांमध्ये तब्बल 185 केसेसमध्ये 2 हजार 256 किलो प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेले प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर या केसेसमध्ये तब्बल 9 लाख 70 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे, अशी माहिती घन कचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली.
राऊत यांनी सांगितले, की महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. राज्यात 2018 पासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईला 1 जुलैपासून अधिक गती देण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यावरणावर दुष्परिणाम करणार्‍या प्लास्टिकचा वापर टाळावा असेही आवाहन राउत यांनी केले आहे.
मागील दोन आठवड्यांमध्ये या पथकाने कचरा टाकणार्‍या 15 जणांवर कारवाई केली आहे.
त्यांच्याकडून साडेनऊ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे, अशी माहिती आशा राउत यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: