Monday, September 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अर्जून खोतकरांनी कृष्णरुपी उद्धव ठाकरेंकडे जावं – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला दिल्लीला पोहोचले होते. यामुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत का? अशा चर्चा सुरु आहे.
खोतकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर कोणतेही राजकीय भाष्य करणे निलम गोऱ्हेंनी टाळलं आहे. मात्र, महाभारतातील उदाहरण देत अर्जूनानं कृष्णरुपी ठाकरेंकडे जावं. असा सल्ला निलम गोऱ्हेंनी खोतकरांना दिला आहे.

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभेच्या उसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली. शिवसेनेकडून62 किलोचा प्रसाद आज दाखवला. या आरती वेळी शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या,देशाची सेवा करण्यासाठी उद्धवजी यांना यश मिळो. देवाने त्यांना शक्ती आणि युक्ती द्यावी ही गणेशाला माझ्याकडून प्रार्थना आहे. बाळासाहेबांचे वाक्य मी ऐकल आहे की, देवाच्या देवळात येताना राजकारणाचे जोडे बाहेर काढून यायचे असतात. त्यामुळे आम्ही कोणाच्याही विरोधात जाऊन आरती करत नाही. राजकीय मतभेद असतील तरी सुद्धा ते देवाच्या दारात नाही .असं शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाला टोला लगावला.
आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रा काढत आहेत त्यावर गोऱ्हे म्हणाल्या,आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते आहे. शिवसैनिकांच्या मनामध्ये काय आहे ते ओळखूनच उद्धव ठाकरे बोलत असतात. जे मनात आहे तेच व्यक्त करण्याची परंपरा बाळासाहेबांपासून आहे. कुठलाही नेता ज्याच्या मनात जे असतं तेच बोलत असतो. म्हणूनच तो नेता असतो हे राजकारणातील लोकांना परिपक्व बुद्धी असली पाहिजे. शिवसेना हे सत्तेत असो किंवा नसो शिवसेना सगळ्यांनाच मदत करत आहे.असे गोऱ्हे म्हणाल्या.

बावनकुळे यांना जी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांना मातोश्रीच्या आतमध्ये काय आहे ते दिसत आहे. ऊर्जामंत्री असल्यामुळे त्यांनी काही यंत्र बसवला असावा अशी टीका बावनकुळे यांच्यावरती नीलम गोऱ्हे यांनी केली. पुण्यात चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. त्यामुळे गृहविभागाला पत्र द्यायचं आहे. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार न झाल्याने अडचण निर्माण होते आहे असंही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading