Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीच्या 100 नव्या ई-बसेस’ चार्जिंग पाँईंट्स अभावी’ पडून – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : पंतप्रधान मोदींनी पीएमपीएमएल च्या थाटामाटात ऊदघाटन केलेल्या इलेक्ट्रीक बसेस अद्याप ही संपुर्णपणे प्रवाशांच्या सेवेत नसुन सु १०० वा अधिक बसेस केवळ इलेक्ट्रीक चार्जिंग पॅाईंट्स ऊपलब्ध नसल्याने सु ६ महीन्यांहून अधिक काळ निव्वळ पडून असून, मनपा प्रशासनास ही बाब शरमेची आहे.. वास्तविक ‘प्रशासकीय काळात’ निर्णय घेण्याचे एक हाती अधिकार असतांना देखील मोठ्या प्रमाणावर बसेस पडून नव्या कोऱ्या बसेस सडत आहेत.. त्यांचे गुंतवणूकीवरील व्याज, त्यावरील कर्मचारी वर्गास बेरोजगारी इ चा फटका देखील मनपा स बसत असून ही अत्यंत निंदनीय बाब आहे.. राज्याचे मुख्य सचिवांकडे या बाबत ही बाब काँग्रेस पक्ष निदर्शनास आणणार असुन या हलगर्जीपणास कारणीभूत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे ही प्रवक्ते व पीएमपीएमएल कामगार संघ (इंटक) चे सल्लागार गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले..

मोठ्या संख्येने बसेस वापरात नसल्याने, नागरीकांची गैरसोय व प्रदुषण मुक्ती मध्ये बाधा देखील येत असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading