शेतकऱ्या सह शेतमजुरांनाही आर्थिक मदतीची गरज! ओला दुष्काळ जाहीर करा: रंगा राचुरे
पुणे : जुलै पहिल्या पंधरवड्यापासून मुख्यत्वे विदर्भ आणि मराठवाड्यांच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नदी – नाल्यांना पूर आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून अनेकांच्या शेतातील माती खरडून गेली आहे. अनेकांवर दुबार अन् तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे. महाराष्ट्रात एकूण आठ लाख हेक्टर मधील पिके पाण्याखाली गेल्याच्या बातम्या आहेत. अश्या स्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्याच वेळेस शेतमजुरीवर पोट अवलंबून असणार्याना हाताला काहीही काम नसल्याने , रोजगार न मिळाल्यामुळे याचा फटका बसत आहे. त्यामुळे #ओला #दुष्काळ जाहीर करा व शेतकर्यसोबत शेतमजूरालापण आर्थिक मदत देण्याची जाहीर मागणी आम आदमी पार्टी चे राज्य सयोजक रंगा राचुरे यांनी केली आहे.