fbpx

नवीन मराठी शाळेत भक्ती आणि वीर रसाचा अनोखा संगम

पुणे  : भक्ती रस आणि वीर रसाचा अनोखा संगम साधत डीईएसच्या नवीन मराठी शाळेत कारगिल विजय दिन आणि संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर हेमंत मावळे देशभक्तिच्या कीर्तिचा पोवाडा सादर केला. ह. भ. प. अर्चना देव यांनी कीर्तनातून संत नामदेव महाराज यांच्या कथा, अभंग, जीवन चरित्र सांगत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. चिन्मय वाईकर यांनी तबल्यावर तर पूजा अवचट यांनी हार्मोनियमवर साथ संगत दिली. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय तळपे, तनुजा तिकोने, रुपाली सावंत, मिनल कचरे, भाग्यश्री हजारे, सोनाली मुंढे यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: