fbpx

महा एनजीओ फेडरेशनतर्फे महाराष्ट्रात २७०४ वृक्षांची लागवड

पुणे : झाडे ही पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत. झाडांचे मानवाच्या जीवनात खूप महत्त्व आहे. जंगल आणि वने ही निसर्गाच्या उत्तम सौंदर्याचा साठा आहेत. त्यामुळे महा एनजीओ फेडरेशनतर्फे महाराष्ट्रात २७०४ वृक्षांची लागवड करण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागांतील ५२ सामाजिक संस्था व संघटनांनी या उपक्रमात सहभाग घेत वृक्षारोपण करीत वृक्षसंवर्धनाचा संकल्प देखील केला.

महाराष्ट्रातील बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, अहमदनगर, संभाजीनगर, अमरावती, नंदुरबार, नागपूर , बीड, अकोला, यवतमाळ, सातारा, जालना, कोल्हापूर, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली इत्यादी जिल्ह्यातील सक्रिय सामाजिक संस्थांनी महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने वृक्षारोपण केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला. फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते, तर चंद्रकांत राठी यांनी विशेष सहाय्य केले. फेडरेशनचे मुकुंद शिंदे, अक्षय महाराज भोसले यांनी नियोजन केले.

शेखर मुंदडा म्हणाले, मानव आणि निसर्ग यांच्यात जुना संबंध आहे. या निसर्गातूनच मानवाचा जन्म झाला आहे. मानव या निसर्गातूनच जन्माला आला, वाढला आणि इथेच विलीन सुद्धा झाला. या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी या मिळू लागल्या. म्हणून त्याचे जीवन जगणे अत्यंत सोपे झाले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे अशा ओळींच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व समाजाला समजावून सांगितले. त्यामुळेच महा एनजीओ फेडरेशन संतांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सतत समाजाच्या सेवेत गुंतलेला असतो. वृक्षारोपणाचा उपक्रम हा यातीलच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: