fbpx

संदीप खरे यांना रोटरी कलागौरव पुरस्कार प्रदान

पुणे : सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांना रोटरी कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या अध्यक्षा पद्मजा जोशी ,रोटरी क्लब ऑफ पुणेकर्वेनगरचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासचे अध्यक्ष अजय मुटाटकर आणि अश्विनी शिलेदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गांधी भवन ( कोथरुड ) येथे हा कार्यक्रम झाला.

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन, रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास यांनी संयुक्तपणे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संदीप खरे यांच्या कविता वाचनाचा ‘मौनाची भाषांतरे ‘हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आयोजित केला होता .त्यांनी ‘सायकल’, ‘स्पायडरमॅन’ ,’प्रलय’ या सारख्या अनेक लोकप्रिय कवितांचे वाचन केले.या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा ़भरघोस प्रतिसाद लाभला .

Leave a Reply

%d bloggers like this: