fbpx

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना मोफा प्रकरणात जामीन मंजूर

पुणे : शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावयसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कुलकर्णी यांना मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर झाला असून कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट विकत घेणाऱ्याकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा त्या खरेदीदारांना दिलाच नाही असे आरोप त्यांच्यावर आहेत. दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. सत्र न्यायाधीश एस.के. डुगावकर यांनी हा आदेश दिला.

या गुन्ह्याच्या संदर्भात डीएसके यांना 5 मार्च 2019 रोजी अटक करण्यात आली होती. मात्र ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मुख्य गुन्ह्यात डीएसके आणि इतर आरोपी 17 फेब्रुवारी 2018 पासून तुरुंगात आहेत.

या गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि ऍड. रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता. मुख्य गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी देखील डीएसके यांनी अर्ज केलेला आहे. हा अर्ज सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर 26 जुलै रोजी सुनावणी होणे अपेक्षित आहे

Leave a Reply

%d bloggers like this: