fbpx

फॅशन शो च्या माध्यमातून दिली एचआयव्ही बाधितांना मदत

पुणे : कशीश प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘MR, MISS, MRS. GLOBAL MAHARASHTRA’ आणि लहान मुलांसाठी ‘RISING STAR’ या फॅशन शोचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या शो मधून जमा झालेल्या निधीतील काही रक्कम ही एच. आय. व्ही. ग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून दिली असल्याची माहिती कशीश प्रॉडक्शन्सचे संस्थापक आणि मॉडेल ग्रुमर व अभिनेता – दिग्दर्शक योगेश पवार यांनी दिली.

स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे थाटात पार पडली. ‘RISING STAR’ फॅशन शोमधील बच्चे कंपनींचा आत्मविश्वासाने असलेला वावर व ‘MR, MISS, MRS. GLOBAL MAHARASHTRA’ स्पर्धेतील स्पर्धकांची अचूक उत्तरे यामुळे ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. यावेळी महाराष्ट्र शो डायरेक्टर नम्रता काळे, नेहा घोलप- पाटील आदी उपस्थित होत्या. तर परीक्षक म्हणून प्रसाद खैरे, प्रियांका मिसाळ, पूजा वाघ, भाग्यश्री बोरसे, ब्रँड अॅम्बेसेडर रेश्मा पाटील आणि डॉ. दत्तात्रय सोनवलकर यांनी काम पाहिले. तसेच अंजली रघुनाथ वाघ, वैभवी गोसावी, ऐश्वर्या पवार, नरेश फुलेलू, क्षितिज गायकवाड, रजत मिरके यांनी सहाय्यक म्हणून काम केले.    

या स्पर्धेसाठी पुणे, मुंबईसह ग्रामीण भागातील 100 जणांची निवड करण्यात आली होती. या फॅशन शोसाठी ‘Rajasa by Ishan Ethnic collection’ यांचे विशेष सहकार्य लाभले. तर Makeup सहकार्य Lakme Academy, Kharadi यांचे मिळाले. स्पर्धेचे सूत्रसंचालन महेश सोनी यांनी केले.

अंतीम निकाल

kids 1 (Boy)

Winner – शिवतेज शिंदे

1st Runner up – अरीहान

2 st Runner up -धैर्य सूर्यवंशी

kids 1 (Girl)

Winner – स्वराली जयकर

1st Runner up – मयूरी राहींज

2st Runner up – अन्विका मोरे

kids 2 (Boy)

Winner – अथर्व जगताप

1st Runner up – अर्णव

2 st Runner up – मंथन ओंबासे

kids 2 (Girl)

Winner – इरा इंगवले

1st Runner up – रिया परदेशी

2 st Runner up – मृणाल बागूल

Miss

Winner – प्रनोती चैतन्य

1st Runner up – मानवी जग्यासी

2 st Runner up – रसिका घुमे

Mrs.

Winner – अमृता शिंदे

1st Runner up – गौरी दवे

2 st Runner up – सुनीता कदम

Mr.

Winner – कॉनराड रेबेलो

1st Runner up – अमित दळवी

2 st Runner up – अरेफली कोतवाल

Leave a Reply

%d bloggers like this: