खड्ड्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
पुणे: खड्डा आंदोलन … होय, पुणे बदललय … खड्ड्यात घालवलय … पुणे शहरात सर्वच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परंतू आत्ताचे प्रशासन, आणि बरखास्त झालेले मनपातील सत्ताधारी यांनी पुणेकरांवर घोर अन्याय केला आहे. पाच वर्ष फक्त सत्ता उपभोगून मनपाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम केले. शहरात बॅनरबाजी करून पुणे बदलतय स्मार्ट होतय असे भासवून पुणेकर जनतेची दिशाभूल केली. पुणेकर म्हणतायत खरच पुणे बदललय … खड्ड्यात घालवलय … परंतू आता आम्ही यांनाच खड्ड्यात गाडणार … घरी बसवणार …
शिवसेना पुणे शहराचे वतीने अलका चौकात आंदोलन करून निषेध करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला शहर संघटिका संगिता ठोसर, सविता मते, छायाताई भोसले, अमृत पठारे, सरोज कार्वेकर, मनिषा कुलकर्णी, नेहा कुलकर्णी , हेमलता परदेशी, अशोक हरणावळ, प्रसाद काकडे, राजू पवार, उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अमर मारटकर, संतोष गोपाळ, जगदिश दिघे, सागर पेटाडे, अजय शिंदे, संजय गवळी, राम थरकुडे, सनी गवते, चेतन चव्हाण, संजय वाल्हेकर, नंदू येवले, रूपेश पवार, संदिप गायकवाड, चंदन साळुंके, निरंजन कुलकर्णी, राज पायगुडे, संतोष शेलार, दिलीप पोमण, किशोर रजपूत, झुंबर तांबोळी, आकाश रेणूसे ई शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
