fbpx

ईजबझने भारतीय शॉपिफाय व्यापा-यांना बनवले अधिक सक्षम

मुंबई : आपल्या उत्पादनांची भारतभरात विक्री करणा-या शॉपिफाय व्यापा-यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन पेमेंट संसाधने उपलब्ध झाल्याची घोषणा पेमेंट सोल्युशन प्लॅटफॉर्म ईजबझने (Easebuzz) आज केली. पेमेंटशी संबंधित इत्यंभूत संसाधने उपलब्ध करून देणा-या आपल्या सेवासंचाच्या माध्यमातून ईजबझ सध्या देशभरातील ७०,००० हून अधिक व्यापा-यांना सेवा पुरवते, आणि शॉपिफायशी एकत्रिकरण झाल्यानंतर आपला पेमेंट गेटवे एपीआय ऑफरिंग्ज आणि इतर मूल्यवर्धित सेवांद्वारे भारतातील शॉपिफाय मर्चंट स्टोअर्सच्या व्यवसायांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ईजबझने आखले आहे. स्वस्त इंटरनेट सेवा आणि स्मार्टफोन्सची उपलब्धता यांमुळे वेगाने प्रगती करत असलेले ईकॉमर्सचे क्षेत्र भारतामध्ये १९.२४ टक्क्यांच्या सीएजीआरने वाढत आहे आणि २०२५ पर्यंत १११.४० बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची संधी या क्षेत्राला आहे.

ईजबझच्या बिझनेस विभागाचे ग्रुप हेड रोहित कट्याल म्हणाले, “ईजबझच्या साथीने शॉपिफायवरील व्यावसायिकांना वेबसाइट आणि ऑनलाइन स्टोअर्सच्या माध्यमातून आपली उत्पादने कुणालाही, कुठेही ऑनलाइन विकता येतील व सहजपणे पेमेंट प्राप्त करता येईल. या पार्टनरशिपमुळे व्यावसायिकांना आपल्या ऑर्डर्सचे व्यवस्थापन, त्यांचे कुठेही शिपिंग करणे आणि पेमेंट्स मिळविणे या गोष्टी एकच डॅशबॉर्ड वापरून करण्याची सोय होईल. इत्यंभूत सेवांद्वारे व्यापा-यांना शॉपिफायवर आपला ईकॉमर्स प्लॅटफॉर्म उभारता येईल आणि सुरक्षित पेमेंट प्रक्रियेची डोकेदुखी ईजबझवर सोडून निश्चिंत राहता येईल.”

शॉपिफाय इंडियाचे बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख सिद्धांत राणा म्हणाले, ““शॉपिफाय व्यापा-यांना आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करता यावे व त्याची व्याप्ती वाढविता यावी यासाठी त्यांची मदत करणा-या पेमेंट यंत्रणांचे अधिक विस्तृत पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ईजबझ सारख्या स्थानिक पार्टनर्सबरोबर सहयोग साधत भारतीय व्यापा-यांसाठी ई-कॉमर्सचे क्षेत्र अधिक चांगले बनविणे हे शॉपिफायचे लक्ष्य आहे.”

ईजबझ पेमेंटच्या शॉपिफायबरोबर झालेल्या एकत्रिकरणामुळे व्यापारी संस्थांना आपल्या ग्राहकांना क्रेडिट/डेबिट कार्ड, नेटबँकिंग, यूपीआय, वॉलेट्स इत्यादी शंभरहून अधिक पेमेंट मोड्सचे पर्याय देण्याची क्षमता प्राप्त होईल. थोडे सेटअप शुल्क आणि किमान व्यवहार शुल्क यांमुळे शॉपिफाय आणि ईजबझचा हा सहयोग अखंड पेमेंट प्रोसेसिंग, कस्टमाइझ्ड ब्रॅण्डिंग असलेली चेकआउट पेजेस, इस्टंट सेटलमेंट्स आणि इतर प्रगत इकॉमर्स पेमेंट गेटवे वैशिष्ट्ये उपलब्ध करून देऊ शकेल, जो व्यापा-यांना ऑनलाइन पेमेंट्सच्या कोणत्याही मार्गाने पैसे प्राप्त करण्यास सक्षम बनवेल.

Leave a Reply

%d bloggers like this: