fbpx

महिंद्रा फायनान्स क्रेडजेनिक्ससह डिजिटल कलेक्शन्सला चालना देणार

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या भारतातील आघाडीच्या नॉन- बँकिंग फायनान्स कंपनीने आज क्रेडजेनिक्स या सासवर (सॉफ्टवेयर अज ए सर्व्हिस) आधारित कलेक्शन्सची आघाडीची पुरवठादार आणि डेट रेझोल्यूशन तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मशी भागिदारी केल्याचे जाहीर केले. या सहकार्याच्या मदतीने महिंद्रा फायनान्सने आपल्या रिटेल कर्ज सुविधा डिजिटल पातळीवर सक्षम करण्याचे ठरवले आहे.

क्रेडजेनिक्स प्लॅटफॉर्ममुळे महिंद्रा फायनान्सला कर्ज श्रेणीतील लिटिगेशन मोड्युलसह कर्जदाराशी असलेला संवाद सुव्यवस्थित करण्यात व त्याचे डिजिटायझेशन करण्यात मदत होईल. विविध पुरवठादारांमध्ये विभागली गेलेली क्षमता बळकट करत क्रेडजेनिक्स प्लॅटफॉर्म प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी करेल तसेच कर्जपुरवठा हाताळणाऱ्या टीम्सना गाव पातळीवर आणि पिनकोडच्या ठिकाणी सर्वसमावेश ट्रॅकिंग सेवा पुरवेल.

या उपक्रमाविषयी महिंद्रा फायनान्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर म्हणाले, ‘बदलत्या काळासह ग्राहकांच्या अपेक्षा आणि वर्तन बदलत आहे. ग्रामीण भारत डिजिटल अर्थव्यवस्था विशेषतः पेमेंट्स पद्धतींना स्वीकारत असताना आम्ही आमच्या सर्व ग्राहकांशी आनंददायी आणि लक्षणीय नाते जोडण्याचे ध्येय ठेवले आहे. क्रेडजेनिक्सच्या मदतीने आम्ही ग्राहकांना स्वयं- सेवा सुविधा आणि फिजिटल/ सोल्यूशन्स पुरवण्यासाठी आवश्यक क्षमता कार्यरत करणार आहोत.’

महिंद्रा फायनान्सचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी रॉल रिबेलो म्हणाले, ‘वैविध्यपूर्ण ग्राहकवर्ग तयार करणे व त्यांना सेवा देणे, तसेच शाश्वत सुविधांसह कलेक्शन्समध्ये कार्यक्षमता आणणे हा आमच्या स्थित्यंतरानंतर आखलेल्या ध्येयाचा प्रमुख भाग आहे. पुनर्फेडीसह प्रत्येक टप्प्यावर सफाईदारपणे सीएक्स पुरवणे हे आमचे ध्येय आहे, जे क्रेडजेनिक्स अमलात आणेल. मला खात्री आहे, की हे सहकार्य दोन्ही भागिदारांसाठी फायदेशीर ठरेल.’

क्रेडजेनिक्सचे सह- संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रिषभ गोएलम्हणाले, ‘महिंद्रा फायनान्ससारख्या भारतातील आघाडीच्या, ग्राहकाभिमुखता आणि नाविन्यपूर्ण पद्धतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या एनबीएफसीसह काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.   लिटीगेशन व्यवस्थापन आणि ग्राहक कम्युनिकेशन रिटेल कलेक्शनसाठी महत्त्वाचे आहेत आणि क्रेडजेनिक्स या क्षेत्रात तज्ज्ञ आहे. आम्हाला खात्री आहे, की क्रेडजेनिक्सच्या अनोख्या क्षमता महिंद्रा फायनान्सचे कलेक्शन ऑपरेशन्स उंचावतील.’

Leave a Reply

%d bloggers like this: