fbpx

शाळकरी मुलांसाठी विद्यापीठात व्यंगचित्रकला कार्यशाळा

३० जुलै रोजी कार्यशाळा; नाव नोंदणी सुरू

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या व्यंगचित्रकला संग्रहालयातर्फे १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ३० जुलै रोजी व्यंगचित्रकला कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेचा उद्देश मुलांना कार्टूनिंगची मूलभूत कौशल्ये शिकवणे आणि कॉमिक्ससाठी त्यांची स्वतःची कार्टून पात्रे तयार करण्यासाठी प्रगत तंत्रे शिकवणे हा आहे.

ही कार्यशाळा ३० जुलै रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० या वेळेत होणार असून यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

व्यंगचित्रकार सूरज एस्के श्रीराम हे मुलांना मार्गदर्शन करतील. (ही कार्यशाळा मंगा कॉमिक्समध्ये स्वारस्य असलेल्या मुलांसाठी नाही).

यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत खालील रेखाचित्र साहित्य आणणे आवश्यक आहे:

  • स्केच बुक/ड्रॉइंग पेपर
  • पेन्सिल आणि खोडरबर
  • रंगीत साहित्य जसे की रंगीत पेन्सिल, मार्कर किंवा क्रेयॉन इ.

कार्यशाळेच्या समारोपानंतर, मुलांना ‘सहभागाचे प्रमाणपत्र’ मिळेल. कार्यशाळेसाठी नोंदणी करण्यासाठी कृपया http://www.unipune.ac.in या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रेस रिलिज सेक्शन मध्ये दिलेली माहिती वाचून संपर्क साधावा. कार्यशाळेची नोंदणी २० मुलांपर्यंत मर्यादित आहे आणि ती प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने केली जाईल.

Leave a Reply

%d bloggers like this: