fbpx

अजित पवारांना दणका; बारामती नगरपरिषदेच्या 245 कोटींच्या कामांना शिंदेंकडून स्थगिती

मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यातील वाद थांबत नाही ठाकरे सरकारच्या काही निर्णयांना स्थगिती दिल्या नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. 941 कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना स्थगिती दिली. विशेष म्हणजे विशेष म्हणजे यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगर परिषदेची आहेत. शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीकडून निधी दिला जात नव्हता असा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंड केले होते. त्यानंतर बऱ्याच धक्कादायक घडामोडींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आता शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टार्गेट केल्याचे दिसत आहे.

शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीला स्थगिती दिली आहे. मार्च 2022 ते जून 2022 या काळात मविआ सरकारने हा निधी मंजूर केला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेला निधीलाही स्थगिती दिली आहे. मात्र शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिंदे गट अजूनही शिवसेनेच्या जवळच असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: