स्त्री आधार केंद्राच्या वाचनालयाला कै. ज्योती कोटकर यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची स्मृती कायम ठेवणार – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : सामाजिक कार्यात गेली अनेक वर्षे भरीव काम केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या कै. ज्योती कोटकर यांचे नाव पुण्यातील स्त्री आधार केंद्रातील वाचनालयाला लवकरच देण्यात येईल. या माध्यमातून स्त्री आधार केंद्र आणि महिलांसाठी आजवर केलेल्या कामांचे कायम स्मरण राहील. त्यांच्या खंबीरपणे काम आणि सर्व प्रकारच्या कामाला कायम पुढाकार घेण्याच्या सवयीने आपल्या कामाला खरोखरीच बळ मिळेल असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.
पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या श्रीमती ज्योती कोटकर यांचे नुकतेच निधन झाले. त्या अनुषंगाने श्रद्धांजली सभा आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्यांचा स्त्री आधार केंद्राच्या कामाच्या उभारणीत अतिशय जवळचा संबंध होता.
या निमित्ताने स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, मीनाताई इनामदार, ज्योती कोटकर यांचे कुटुंबीय मुलगा यतीन, सून राखी, नातवंडे, भगिनी, कल्पना निकम, शेलार गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते दीपक देशमुख, अनिता परदेशी, सविता लांडगे आणि विविध क्षेत्रात काम करीत असलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन अनिता शिंदे यांनी केले.
