रुग्णांना जीवनदान देणारे देवदूत म्हणजे डॉक्टर – रविंद्र साळेगावकर
पुणे : कोरोनाकाळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देवदूताची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर्सचा भाजपा शिवाजी नगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. रविवारी करण्यात आलेल्या ‘डॉक्टर्स’च्या सन्मान सोहळ्या निमित्ताने शिवाजी नगर परिसरातील पन्नास डॉक्टरांच्या कार्याचा गौरव; सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, संपादा सहकारी बँकचे संचालक तसेच पच्छीम महाराष्ट्र क्रिडा भारतीचे संपर्क प्रमुख, हरिशदादा अनगोळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजक, भाजपा शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रविंद्र साळेगावकर यांचे कौतुक करून डॉक्टरांचे अभिनंदन केले. सोबतच सोहळ्या प्रसंगी भाजपा पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, भाजप पुणे युवा मोर्चाचे अध्यक्ष अपूर्व खाडे, वैद्यकीय आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष डॉ. संदीप भुतडा, शिवाजी नगर डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. झिने पाटील, खजिनदार डॉ. श्रीराम जोशी, धनंजय जाधव, आदि प्रमुख मान्यवर तसेच सन्मानार्थी सर्व डॉक्टर्स, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘कोरोनाच्या काळात रात्रंदिवस रुग्णसेवेचे व्रत जपणारे डॉक्टर्स देवदूतच आहेत. त्यांच्या कौशल्याने आणि ज्ञानाने अनेकांना जीवनदान मिळाले. कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांवर उपचार करून आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा सन्मान आयोजित केल्या बद्दल
डॉक्टर करत असलेल्या कष्टाच्या बळावरच कोरोनाचा लढा आपण यशस्वीपणे लढत आहोत, त्यांच्या या सेवेला सलाम करत रविंद्र साळेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश बडदे यांनी तर गणेश बगाडे यांनी आभार मानले.