fbpx

‘बीएसएएम’कडून राष्ट्रीय पदकविजेते आणि अध्यक्ष राजन खिंवसरा यांचा सत्कार

पुणे :  गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू, तसेच राष्ट्रीय व राज्य संघटनेचे अध्यक्ष राजन खिंवसरा यांचा महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स व स्नूकर संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे हा समारंभ नुकताच पार पडला.

खासदार प्रिंयांका चतुर्वेदी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्याच हस्ते खेळाडूंना, तसेच राजन खिंवसरा यांना सन्मानित करण्यात आले. दोन वेळचा आशियाई विजेता आणि अनेकदा राष्ट्रीय वजेतेपद पटकावणार्‍या यासिन मर्चंट याचा खेळासाठी बहुमोल योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
 
यावेळी पुढील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला- सुमेर मागो- सुवर्ण (सबज्युनियर मुले – बिलियर्ड्स), श्याम राझमी- रौप्य  (सबज्युनियर मुले – बिलियर्ड्स), रयाम राझमी- सुवर्ण  (ज्युनियर मुले – बिलियर्ड्स) व  (ज्युनियर मुले – स्नूकर), क्रिश गुरबक्षानी- कांस्य (ज्युनियर मुले – स्नूकर) व रौप्य (ज्युनियर मुले – बिलियर्ड्स), अरांता सांचिस- कांस्य (महिला बिलियर्ड्स), ध्रुव सितवाला- रौप्य (पुरुष बिलियर्ड्स), ईशप्रीतसिंग चढ्ढा – सुवर्ण (पुरुष स्नूकर. अरांता समारंभाला हजर नव्हत्या.

प्रियांका चतुर्वेदी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी प्रथम उपस्थित गुरूंचे अभिनंदन करते, असे सांगून त्या म्हणाल्या, की अफाट परिश्रम आणि निष्ठा यामुळेच तुम्ही येथे पोहोचला आहात. तुमचा सत्कार करताना मलाच सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. तुमच्या कामगिरीबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो. परंतु आम्ही राजकारण्यांनी तुमच्यासाठी काही केलेले नाही. आम्हाला त्यातले काही कळत नाही.

सत्कारार्थी राजन खिंवसरा यांनी या सन्मानाबद्दल सर्वांचे आभार ामनले. तसेच माझे कुटुंबीय व संपूर्ण देशाचे मी आभार मानतो, असे सांगून ते म्हणाले, की हा केवळ राज्य संघटनेचा सत्कार नाही. तर माझ्या सर्व सहकार्‍यांचा आहे. त्यांनी दाखविलेल्या विश्‍वासाचे हे बळ आहे. याच जोरावर मी यापुढेही आणखी चांगली कामगिरी करून दाखवेन.

ते पुढे म्हणाले की, या खेळाने देशाला 50 हून अधिक सुवर्णपदके मिळवून दिली आहेत आणि येथे बसलेल्या युवकांकडून आणखी अनेक मिळणार आहेत, असे मी चतुर्वेदी यांना सांगत होतो. या युवकांकडे पाहून मला प्रेरणा मिळते. तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन. तुम्ही केवळ निष्ठेने खेळत रोहो आणि आणखी खूप पदके जिंका, असे आवाहन खेळाडूंना करून ते म्हणाले, की तुम्हाला काही कमी पडू दिले जाणार नाही, याची मी, यासिनभाई आणि संघटना मिळून काळजी घेऊ.

व्यावसायिक स्तरावर उत्तम कामगिरी करा आणि मी तुम्हाला हवे ते देईन, असे आवाहन करून खिंवसरा म्हणाले, की तुमच्यात प्रचंड गुणवत्ता असल्याचे मला दिसते आहे. परंतु त्या गुणवत्तेचे रूपांतर पदकांमध्ये करणे तुमच्या हातात आहे. आम्ही तुमच्या उत्तम कामगिरीची वाट पाहात आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: