Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्रात पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त; नगराध्यक्ष, सरपंच थेट निवडणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल च्या दरात काही महिन्यांपूर्वी कपात केली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला कर कमी करण्याचे आवाहन केले होते. इतर राज्यांनी कमी केले होते मात्र महाराष्ट्राने कमी केले नव्हते. यामुळे आज पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये कमी करण्याचा निर्णय शासनाच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात

पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
( वित्त विभाग)

राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)

केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
(नगर विकास विभाग)

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
(नगर विकास विभाग)

राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)

अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)

बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
(पणन विभाग)

आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार
(सामान्य प्रशासन विभाग)

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading