fbpx

अभाविप तर्फे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट विनामूल्य ऑनलाईन मॉक टेस्टचे आयोजन

 

पुणे :  JEE, MHT-CET (अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशासाठी) आणि NEET परीक्षा (वैद्यकीय प्रवेशासाठी) प्रवेश परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहे, त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी मित्र विनामूल्य मॉक आयोजित करत आहेत.
एबीव्हीपी आणि विद्यार्थी मित्र (www.vidyarthimitra.org)” संयुक्तपणे ऑनलाइन मॉक चाचणी विद्यार्थ्यांना मागील ५ वर्षांपासून विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत. मॉक परीक्षेतुनच सराव करून अभ्यास स्तर आणि इतर तयारीच्या विद्यार्थ्यांची पातळी तपासण्याची संधी व प्रत्यक्ष परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतील आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील.
“विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आणि चांगल्या कोर्स / महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पुरेसा सराव मिळाला पाहिजे आणि म्हणूनच अभ्यासाची आणि तयारीची पातळी तपासण्यासाठी नेमके वातावरणात विद्यार्थ्यांनी स्वत:चे परीक्षण केले पाहिजे आणि किती तयारी झाली हे जाणून घेतल पाहिजे. हे त्यांना पुढील दुरुस्त्या करण्यात आणि शेवटच्या दिवसात गांभीर्याने अभ्यास करण्यात मदत करेल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी विनामूल्य ऑनलाईन परीक्षा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
एमएचटी-सीईटी, जेईई, एनईईटी परीक्षा होण्यापूर्वी एकाच वेळी महाराष्ट्रात घेण्यात येणारी ही सर्वात मोठी मॉक एमएचटी-सीईटी, जेईई, एनईईटी सराव परीक्षा आहे.
लवकरच विद्यार्थी मित्र सी. ए. टी,(CAT) एम. बी. ए.-सी.ई.टी. (MBA), एन.डी.ए.(NDA), बँकिंग, एस.एस.सी., रेल्वे भरती इ. ची मॉक परीक्षा घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मॉक परीक्षेचा लाभ घेऊ शकेल.
विनामूल्य ऑनलाईन मॉक परीक्षेचे वेळापत्रक
1) JEE (Main)
सराव परीक्षा – १९ जुलै २०२२
2) NEET
सराव परीक्षा – १५ जुलै २०२२
3) MHT-CET
सराव परीक्षा – PCM- ०६ ऑगस्ट २०२२
सराव परीक्षा- PCB- ०७ ऑगस्ट २०२२

मॉक टेस्टची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत:
• आयआयटी, एनआयटी आणि डॉक्टरांचे एल्युमिनि – तज्ञांनी सेट केलेले प्रश्नपत्रे आणि मार्गदर्शन.
• गुणांकन योजना आणि प्रश्न परीक्षेच्या पॅटर्नसारखेच आहेत जे विद्यार्थ्यांना गुण वाढविण्यात आणि उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यास मदत करू शकते.
• इतर विद्यार्थ्यांविरुद्ध आपली कामगिरी तपासून पहा.
•एका क्लिकमध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय आणि सर्व डीटीई अभ्यासक्रमांसाठीच्या कट ऑफची खास माहिती मिळवा.
• आपली राज्यनिहाय व जिल्हावार श्रेणी तपासा.
• अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय व डीटीई प्रवेशाच्या संपूर्ण महाविद्यालये सुरू होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन व पूर्ण सहकार्य मिळवा.

नोंदणी लिंक http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam
आम्ही आपल्यास आणि आपल्या वृत्तपत्राला हे संदेश सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहचण्याचे आवाहन करतो. जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी सराव परीक्षेचा लाभ घेतील. असे आवाहन अभाविप चे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: