fbpx

शिंदे गट महानगरपालिका निवडणूक लढवणार

पुणे : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ४० जणांना पुण्यात सुरुवातीला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यातूनही शिवसेने काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत आहेत
वाढता प्रतिसाद विचारात घेऊन शिंदेसेनाही महापालिका निवडणुकीत उतरणार हे नक्की झाले आहे. ते भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून काही जागा लढवण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने राज्यात राजकीय बंडाळी हाेताना पुणे शहर व जिल्हा एकदम शांत होता. काही दिवसांनी कट्टर शिवसैनिकांनी बंडखोरांचा धिक्कार करत आंदोलनही केले. बंडखाेर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. त्याची सुरुवात शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली. ते उघडपणे एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला हजर राहिले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे काय चुकले याचाही पाढा जाहीरपणे वाचला. त्यानंतर पुण्यातील चलबिचल वाढली.

हडपसरमधील माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री शिंदे यांचे हडपसरमध्ये जाहीर स्वागत केले. यावेळी माजी शहरप्रमुख अजय भोसले, युवा सेनेचे प्रदेश सहसचिव किरण साळी यांनी शिंदे गटाबरोबर असल्याचे जाहीर केले. यातील साळी हे शिंदे गटाला मिळालेले माजी मंत्री उदय सामंत यांचे समर्थक आहेत. भानगिरे यांच्याबरोबर आणखी काही माजी नगरसेवक शिंदेगटाला जाऊन मिळण्याची चर्चा आहे. त्यावरून आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेगट उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: