fbpx

’सत्यमेव जयते’ ब्रीद विनाच् ‘अशोक स्तंभाचे’ अनावरण कसे ? काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : स्वात्र्यंतोत्तर ‘प्रजासत्ताक भारताचे’ सत्यमेव जयते या अर्थपूर्ण ‘राष्ट्रीय ब्रीद’ सह तयार झालेले बोधचिन्ह हे ‘भारताच्या लोकशाहीरूपी संविधानात्मक वाटचालीची दिशा व संकेत दर्शवणारे असून’, सत्यमेव जयते’ ब्रीद चा ऊल्लेख नसतांना ‘अशोक स्तंभाचे’ पुजात्मक – अनावरण वा प्रदर्शीत करण्याची घाई श्रेयजीवी पंतप्रधान मोदींनी खाजगी इव्हेंट द्वारे केली हे संविधानीक मुल्ये व संकेतांची पायमल्ली करणारी खेदजनक घटना असल्याची टिका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..
स्वातंत्र्योत्तर लोकशाहीरुपी भारताची निर्मिती १९४७ ला झाल्यानंतर १९५० मध्ये ‘प्रजासत्ताक भारताची’ जगासमोर ओळख झाली. भारतीय स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, आदींच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांसह घटना-समितीने मोठ्या कालावधीनंतर विचार विमर्षाने संविधान दिले. प्रजासत्ताक भारताचे ‘सत्य मेव जयते’ हे अर्थपूर्ण मौलीक ब्रीद निश्चित करून, त्यावर ३ सिंहाची प्रतिमा बसवून’, भारतीय – प्रशासन व संविधानाचे बोधचिन्ह दिले..!
राष्ट्रीय मानचिन्ह ‘अशोक स्तंभ’ हे ‘सत्यमेव जयते’च्या मुलतत्वावरच आधारीत असून, या ब्रीद शिवाय फक्त ३ सिंहांची प्रतिमा राष्ट्रीय चिन्ह ठरूच शकत नाही.. याचे भान ही ऊपस्थित पंत प्रधान, लोकसभा अध्यक्षांना नसावे, याचे देखील सखेद आश्चर्य वाटते…!
भाजप’ नेतृत्वाने मुळात मनमानी पणे, तातडीजी गरज नसतांना (ऐतिहासीक व सुस्थितीतील प्रशासकीय व संसदीय वास्तू नष्टकरून) हजारो कोटींचा खर्च करून ‘सेंट्रल व्हीस्टा’ च्या रूपाने ‘नवे संसद भवन, पंतप्रधान कार्यालय व निवास स्थान’ कोरोना संकट काळातच बांधण्याचा घाट धातला यावर मुळात अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती.
प्रत्येक बाबतीतच ‘राजकीय श्रेय’ घेणाऱ्या श्रेयजीवी पंतप्रधान मोदी साहेबांना ‘सत्यमेव जयते’ या राष्ट्रीय ब्रीद वाक्याचे वावगे आहे काय..? असा उपरोधिक सवाल देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी विचारला आहे..
संसदीय वास्तू ही ‘लोकसभा अध्यक्षाच्या अखत्यारीत’ येत असतांना त्या विषयीचे ऊदघाटन आदींचे सर्वपक्षीय संविधानात्मक हक्क व संकेत पायदळी तुडवत श्रेयजीवी पंतप्रधान‘राजकीय श्रेय’ घेण्याच्या नादात व्हीस्टा प्रकल्प पुर्ण होण्यापुर्वीच फक्त ‘अशोक स्तंभाचे’ ते देखील “सत्यमेव जयते” हे ब्रीद मानचिन्हात नसतांना घाई घाईने ‘पुजात्मक अनावरण’ व प्रदर्शीत करणारी कृती लोकशाहीरूपी राष्ट्रात अशोभनीय आहे. या कृतीचा आम्ही नि:षेध करतो..! या गंभीर घटनेचा ‘लोकशाहीच्या चौथा स्तंभ’ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी व संसदीय संकेत व प्रणालीचा अवमान करणाऱ्या भाषणजीवी पंतप्रधान मोदीं साहेबांना याविषयी समज द्यावी व जाब विचारावाअसे कॉंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: