fbpx

Pune – खडकवासल्यातून विसर्ग वाढल्यामुळे बाबा भिडे पुल पाण्याखाली

पुणे: धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, पुणेकरांना पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण 100 टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून रात्री आठच्या सुमारास 13 हजार 142 क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणामधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. पावसाळ्यापूर्वी नदी पात्रातील जलपर्णी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी न काढल्याने नदी पात्रात असलेली जलपर्णी आज सकाळी बाबा भिडे पुलाजवळ येऊन मोठ्या प्रमाणावर अडकली होती. यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनने त्वरित सूत्रं हलवित ही जलपर्णी जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढून पाण्याला मार्ग मोकळा करून दिला.संध्याकाळी भिडे पूल पाण्याखाली गेला .

Leave a Reply

%d bloggers like this: