fbpx

Rain update : पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतीवृष्टीचा इशारा

पुणे : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुंबई, पुणे कोल्हापूर, नाशीक, रत्नागिरी, गडचिरोली येथे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून विविध घटनांमध्ये 14 नागरिकांनी आपला जीव गमावलाय. नाशिकच्या गोदावरी नदीला पुर आला असून गोदाकाठाच्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील घाटमाथ्यांसह इतर ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच वर्षा पर्यटनास बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहिती नुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र,पश्चिम किनार्‍यावरील द्रोणिय स्थिती, 20°N पूर्व-पश्चिम शियर,मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे असल्याने पुढील  ४-५ दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह),मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम असणार आहे.

काळजीची बाब म्हणजे, पुढील २,३ दिवसात महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होणाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
म्हणून भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्षा पर्यटनास बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुरक्षितपणे वाहन चालवा आणि सावध रहा, असेही सांगण्यात आले आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

काल (दी. 11) पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वत्र चांगल्या पावसाची नोंद झाली. तसेच हीच परिस्थिती पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. काल पुण्यात (दी.11) संध्याकाळी सहा पर्यंत नोंदवण्यात आलेला पाऊस खालील प्रमाणे –

NDA 126.5 मिमी
भोर 53.5
लवासा 100.5
गिरीवन 55.5
लोणावळा 58.0

तर रात्री 11 ते 12 दरम्यान INS लोणावाळा येथे 1 तासात  22 मिमी पावसाची नोंद केली आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून मध्यरात्री नंतर 856 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: