fbpx

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; खडकवासला भरले, विसर्ग सुरू

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. तर काल (दी.11) पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण ८५ टक्के भरळे असून  पाटबंधारे विभागाने रात्री साडेअकरा वाजता मुठा नदीत ८५६ क्युसेस वेगाने विसर्ग सुरू केला आहे. 

खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता (स्वारगेट) योगेश भंडलकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, काल सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरण ७५.६० टक्के भरलेले होते. मात्र सायंकाळी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २२ मिमी एवढा पाउस  झाला. त्यानंतरही पावसाची संतत धार सुरूच होती. रात्री संडे दहाच्या सुमारास खडकवासला 85 टक्के भरले. त्यानंतर पाटबंधारे विभागाने रात्री साडेअकरा वाजता मुठा नदीत ८५६ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला.  

सायंकाळी ५ वाजता पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहिती नुसार पुण्याच्या चारही धरणात मिळून एकूण ९.४७ टीएमसी म्हणजे ३२.४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी या दिवशी हा धरणसाठा २९.६२ टक्के एवढा होता.  

 

Leave a Reply

%d bloggers like this: