fbpx

गणेशोत्सवात मंडपाचा परवाना पाच वर्षे मुदतीसाठी द्यावा

जय गणेश व्यासपीठाची महापालिका व पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी

पुणे : गेली दोन वर्षे कोवीड च्या परिस्थितीत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला गेला पण यंदाच्या वर्षी नेहमीच्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे….त्या अनुषंगाने जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून उपनगरातील गणेश मंडळांच्या गेले दोन महिने दर रविवारी बैठक घेण्यात येत आहे…आतापर्यंत अरणेश्वर, पर्वती, एरंडवणे,येरवडा,धनकवडी कॅम्प ह्या भागात बैठका घेण्यात आल्या…….व्यासपीठच्या माध्यमातून स्थानिक अडचणींचे निराकरण करणे, मंडळांना सामाजिक काम करण्यासाठी प्रोत्साहन करणे, स्पीकर्स च्या भिंती न उभारणे,गणपती बाप्पाचे पावित्र्य अबाधित ठेवणे, विसर्जन मिरवणूकीत मद्यपान न करणे आदी विषयांवर प्रबोधन करीत जागतिक स्तरावर पुण्याचे गणेशोत्सवाचे ब्रॅन्डींग करण्याविषयी चर्चा करण्यात आली..
या सर्व गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या मिटींग मधून एकमुखाने प्रामुख्याने एकच ठळक मागणी आहे .
दरवर्षी उत्सव मंडपाची जागा तीच असती तरी दरवर्षी परवानगी काढायला लागते त्या ऐवजी उत्सव मंडपात काही बदल नसल्यास मंडप, जाहिरात कमानी, स्पीकर्स, आगमन विसर्जन मिरवणूक परवानगी पाच वर्षे मुदतीसाठी द्यावा.
अश्या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त मा विक्रम कुमार आणि पोलीस सहआयुक्त मा संदीप कर्णीक यांना देण्यात आले.  पोलीस आणि मनपा प्रशासन यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन मंडळांशी समन्वय ठेवून उत्सव साजरा करण्यात येईल असे आश्वासन दिले. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे महेश सुर्यवंशी,सुनिल रासने अखिल मंडई मंडळाचे संजय मते,संकेत मते, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, नितीन पंडित,श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे परेश खांडके, खडक मंडळाचे ॠषिकेश बालगुडे, सेवा मंडळाचे शिरीष मोहीते,वैभव वाघ आदर्श मंडळाचे उदय जगताप, साईनाथ मंडळाचे पियूष शहा, भरत मित्र मंडळाचे विशाल गुंड अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप उपस्थित होते..

Leave a Reply

%d bloggers like this: