fbpx

ग्लेनमार्क ने भारतातील पहिले मुरुमांवरील उपचारांसाठी मिन्यम जेल सादर

पुणे  :  नावीन्यतेवर भर देणारी जागतिक औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ने मिन्यम जेल ब्रँड नावाने मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या मुरुमांवरील उपचारांसाठी भारतातील पहिले टॉपिकल मिनोसायक्लिन ४ टक्के जेल सादर केले आहे. हा एक शक्तिशाली बॅक्टेरिया विरोधी जेल आहे. तो उपलब्ध टॉपिकल अँटीबॅक्टेरियल फॉर्म्युलेशनच्या तुलनेत सर्वात कमी एमआयसी ९० (बॅक्टेरियाच्या ९० टक्के कणांची दृश्यमान वाढ थांबवणारी किमान प्रतिबंधात्मक तीव्रता) प्रदान करते.

टॉपिकल अँटीबॅक्टीरियल फॉर्म्युलेशन हे मुरुमांच्या उपचारांसाठी सामान्यतः वापरल्या जाणार्‍या औषधांचा प्रकार आहेत. गेल्या ३० वर्षांमध्ये कोणतेही नवीन टॉपिकल फॉर्म्युलेशन सादर करण्यात न आल्यामुळे टॉपिकल अँटीबॅक्टेरियल फॉर्म्युलेशनला हळूहळू प्रतिकार वाढत आहे. मुरुमांच्या उपचारांतील वाढत्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मिन्यम जेल (टॉपिकल मिनोसायक्लिन ४ टक्के  जेल) विकसित करण्यात आले असून ९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये वापरण्यास ते सुरक्षित आहे.

या लाँचच्या प्रसंगी बोलतांना ग्लेनमार्क इंडिया फॉर्म्युलेशन्सचे समूह उपाध्यक्ष आणि प्रमुख आलोक मलिक म्हणाले, “ग्लेनमार्क हा भारतातील त्वचाविज्ञान क्षेत्रातील अग्रेसर आहे. रुग्णांना नवीनतम उपचार पर्याय उपलब्ध करून देण्यात तो आघाडीवर आहे. भारतातील प्रथम टॉपिकल मिनोसायक्लिन-आधारित – मिन्यम

जेल सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. मुरुमांमुळे ग्रस्त असलेल्या ९ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या रूग्णांसाठी उपचाराचा एक पर्याय म्हणून त्याच्या शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल प्रभाव, दाह-विरोधी क्रिया आणि सर्वात कमी प्रतिकार यासाठी तो कसोटीवर उतरला आहे.”

पुरळ (मुरुम) हा एक दाहक त्वचा रोग असून तो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो. यात पायलोसेबेशियस युनिट्सचा समावेश असतो आणि कॉमेडोन, पॅप्युल्स आणि पुस्ट्यूल्स यांच्यासह तो दिसून येतो. जोखमीच्या असंख्य घटकांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. पुरळ सहसा कुमारवयीन काळात सुरू होतात आणि पौगंडावस्थेतील व तरुण प्रौढांवर त्यांचा परिणाम होतो. ग्लेनमार्कने भारतातील मुरुमांच्या प्रसाराबाबत २०२० मध्ये केलेल्या संशोधनात असे आढळून आले की एकूण रुग्णांपैकी ४५ टक्के पुरुष आणि ५५ टक्के महिला होत्या. तसेच जवळजवळ ७२ टक्के रुग्ण हे किशोरवयीन गटातील होते तर २७ टक्के रुग्ण प्रौढ गटातील होते.

Leave a Reply

%d bloggers like this: