fbpx

स्वर्गीय ऋता कांगो मेमोरियल आयएमपी पेअर्स स्पर्धेत अशोक वैद्य व नितीन शिरोळे या जोडीला विजेतेपद 

पुणे : पीआरबीए यांच्या मान्यतेखाली पार पडलेल्या स्वर्गीय ऋता कांगो मेमोरियल आयएमपी पेअर्स स्पर्धेत अशोक वैद्य व नितीन शिरोळे या जोडीने अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. 
 
पीवायसी हिंदू जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अशोक वैद्य व नितीन शिरोळे या जोडीने 101 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तर, अविनाश केळकर व सचिन कांगो 95गुणांसह दुसरा आणि प्रमोद जोशी व डॉ.राजेंद्र बेहेरे यांनी 84.5 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.  
 
तसेच, याशिवाय अविनाश प्रधान व  हेमा दाते(33गुण)यांनी सर्वोत्कृष्ट मिश्र जोडी म्हणून, तर सुनीला जोशी व पल्लवी मोडक(21.6गुण)यांनी सर्वोत्कृष्ट महिला जोडी म्हणून पुरस्कार पटकावला.  
 
अतिशय उत्तम ब्रिज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋता राजेंद्र कांगो यांचे गतवर्षी कोविडमुळे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या ब्रिज कारकिर्दीत पीआरबीए डिसेंबर 2020 आणि पीआरबीए मार्च 2021मध्ये लेडीज पेअर पुरस्कार पटकावला होता.  स्पर्धेचे पारितोषिक वितरण राजेंद्र कांगो यांच्या हस्ते करण्यात आले.  
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 
1. अशोक वैद्य आणि नितीन शिरोळे (101 गुण);
2. अविनाश केळकर आणि सचिन कांगो (95 गुण);
3. प्रमोद जोशी आणि डॉ. राजेंद्र बेहेरे (84.5 गुण);
४. सुरेश मालशे आणि सुरेश भट्टड(71 गुण);
5. नितीन वैद्य आणि मिलिंद भडभडे (68.25 गुण);
6. जेके भोसले आणि सतीश गोळे (67.16 गुण);

इतर बक्षिसे:
सर्वोत्कृष्ट मिश्र जोडी: अविनाश प्रधान आणि हेमा दाते (33 गुण);
सर्वोत्कृष्ट महिला जोडी:  सुनीला जोशी आणि पल्लवी मोडक (21.67 गुण).

Leave a Reply

%d bloggers like this: