fbpx

मिवीने ५० तासांचा प्लेटाइम देणारे एअरबड्स ‘ड्युओपॉड्स ए३५०’ लाँच केले

मुंबई : भारतातील आधुनिक हिअरेबल इकोसिस्टिमचा आपला बुके विस्तारित करण्याचा प्रवास सुरू करत मिवी या भारतातील अग्रगण्य स्वदेशी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने त्यांच्या विद्यमान प्रभावी उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नवीन ड्युओपॉड्सची भर केली आहे. ‘मेड-इन-इंडिया’ ड्युओपॉड्सचे नवीन एडिशन ए३५० भारतीय ग्राहकांना पूर्णत: सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देण्यासोबत स्टाइल दर्जामध्ये अधिक आकर्षकतेची भर करणा-या नवोन्मेष्कारी उत्पादनांसह सक्षम करण्याच्या मिवीच्या दृष्टीकोनाशी संलग्न आहे. मिवी ए३५० ची लाँच डे किंमत ९९९ रूपये असेल. मिवी ड्युओपॉड्स ५ रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहेत: ब्लॅक, व्हाइट, मिंट ग्रीन, स्पेस ग्रे आणि ब्ल्यू.

नवीन लाँच केलेल्या उत्पादनामध्ये १३ मिमी इलेक्ट्रो-डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत, जे २० हर्टझ ते २० हजार हर्टझपर्यंत व्यापक वारंवारता रेंजची निर्मिती करत सुस्पष्टपणे आवाज ऐकू येण्याची खात्री देतात. वायरलेस ड्युओपॉड्समध्ये आधुनिक ब्ल्यूटूथ ५.१ तंत्रज्ञान आहे, जे उच्च गतीमध्ये स्थिर कनेक्टीव्हीटी आणि सुलभ ट्रान्समिशन देते. हे ड्युओपॉड्स १० मीटर अंतरापर्यंत आवाज ऐकू येण्याची खात्री देतात, ज्यामुळे तुम्ही डिवाईसच्या जवळ नसताना तुम्हाला स्पष्टपणे व विशाल आवाज ऐकू येतो.

मिवी ए३५० मध्ये ड्युअल मायक्रोफोन आहे, जो फोनवर बोलताना सुस्पष्टपणे आवाज ऐकू येण्याची खात्री देतो. तसेच ड्युओपॉड्समध्ये एएसी व एसबीसी कोडेक्स आहेत, जे उच्च साऊंड क्वॉलिटी देतात. हा डिवाईस युजर अनुभव व सोयीसुविधा वाढवण्यासाठी अॅलेक्सा, सिरी व गुगल असिस्टण्ट सारख्या वॉईस असिस्टण्ट्ससह येतो. हा डिवाईस इअरबड्सवरील टॅपसह कॉल्स घेण्याची व नाकारण्याची आणि आवाजावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा देतो.

मिवी ए३५० ड्युओपॉड्समध्ये दोन्ही बाजूंना ४० एमएएच बॅटरी आहे आणि कॅप्सूलमध्ये ५०० एमएएच बॅटरी आहे. तसेच दोन्ही बाजू एका तासामध्ये चार्ज होतात. ड्युओपॉड्स एका चार्जमध्ये जवळपास ५० तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देतात, ज्यामुळे हे वारंवार दीर्घकाळापर्यंत फोन कॉल्सवर असलेल्यांसाठी आणि आनंदमय सुट्टीची मौजमजा करण्यासाठी दीर्घकाळापर्यंत टिकणा-या बॅटरीची गरज असलेल्या पर्यटकांसाठी अद्भुत पर्याय आहेत. या डिवाईसमध्ये सुपरफास्ट चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी चार्जिंग कनेक्टर आहे. हे वायरलेस इअरबड्स आयपीएक्स४ घाम व जल-रोधक आहेत, ज्यामुळे ते व्यायाम करताना आवडती गाणी ऐकण्याचा आनंद घेण्यास उत्सुक असलेल्या फिटनेस उत्साहींसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

मिवीच्या सह-संस्थापक व सीएमओ मिधुला देवभक्तुनी म्हणाल्या, “आम्हाला आमच्या अत्याधुनिक उत्पादनाच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. हे उत्पादन पूर्णत: मेड इन इंडिया आहे. सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त मिवी ए३५० ड्युओपॉड्स आधुनिक ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन व उत्पादित करण्यात आले आहे. हे उत्पादन आमच्या दर्जात्मक उत्पादनांच्या श्रेणीमधील उत्तम भर आहे, जे योग्य दरामध्ये अद्वितीय डिझाइन, आरामदायीपणा व दर्जा देतात. आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वात अविश्वसनीय अनुभव देण्यासाठी यासारखी अधिक उल्लेखनीय उत्पादने लाँच करत राहू.”

Leave a Reply

%d bloggers like this: