fbpx

अनाथ आश्रमास शालेय साहित्य भेट

पुणे : प्रसिध्द उद्योजक राकेश सोहनलाल जैन (संचालक : चामुंडा स्टोन्स ,पुणे) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दोपोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण आश्रमास शालेय साहित्य आणि आर्थिक मदत केली.  
चामुंडा स्टोन्सचे संचालक राकेश जैन हे आपली सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.याचाच एक भाग म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त दोपोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण आश्रमास शालेय साहित्य आणि आर्थिक मदतीचा चेक अनाथ आश्रमाचे अध्यक्ष देविदास सुरवसे यांच्याकडे सुर्पूत केला. यावेळी राकेश जैन, पंकज शहा, वसंत कोकणे (अध्यक्ष,  लायन्स क्लब काळेवाडी), प्रदीप सोनिग्रा, भरत भूमावत आदी उपस्थित होते. राकेश जैन यांनी नुकतीच झालेली आषाढी वारीतही अन्नदान केले होते. त्याप्रमाणे वेळोवेळी अन्नदान करणे, ब्लँकेट आणि कपडे दान करणे उप्रकम राबवित असतात.

Leave a Reply

%d bloggers like this: