भीमराव व रमाबाई महिला सक्षमीकरणासाठी आवाज उठवणार
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’ बाबासाहेबांच्या जीवनप्रवासाशी निगडित आणखी एक महत्त्वपूर्ण सामाजिक समस्या महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणार आहे. आगामी एपिसोडमध्ये रमाबाई (नारायणी महेश वर्णे) आणि लक्ष्मीबाई (शगुण सिंग) महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या सरलाला मदत करतात. चाळीमधील सर्व रहिवाशांनी केलेल्या विरोधाला न जुमानता त्या सरलाला तिचे घर परत मिळवून देण्यामध्ये मदत करतात. तिच्या व्यथेबाबत समजल्यानंतर भीमराव (अथर्व) तिला तिच्या अधिकारांची जाणीव करून देतात आणि रमाबाईच्या पाठिंब्याने लढण्यास प्रोत्साहित करतात.
तरूण भीमरावांची भूमिका साकारणारा अथर्व म्हणाला, ””बाबासाहेबांनी म्हटले आहे की ‘महिलांनी किती प्रगती साधली यावरून मी समाजाची प्रगती मोजतो’. डॉ. आंबेडकरांनी समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते भारतातील महिला हक्कांचे महान प्रचारक होते. त्यांनी महिलांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी अनेक धोरणे आखली. त्यांनी भारतातील महिलांच्या अधिकारांना प्रबळपणे पाठिंबा दिला आणि महिलांच्या अधिकारांचे संरक्षण व प्रगती करण्यासाठी अनेक कायदे तयार केले. आगामी एपिसोड महिला अधिकार व सक्षमीकरणाच्या या पैलूला सादर करतो.” रमाबाईची भूमिका साकारणारी नारायणी महेश वर्णे म्हणाली, ”रमाबाई महिला सक्षमीकरणाच्या सामाजिक समस्येविरोधात आवाज उठवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या मोठ्या प्रेरणास्रोत होत्या. त्यांनी प्रामाणिकपणा, स्थिरता व दयाळूपणाचे प्रतीक असलेल्या बाबासाहेबांना पाठिंबा दिला. बाबासाहेबांनी सर्व क्षेत्रांमध्ये महिलांसाठी समानतेचे तत्त्व स्थापित करण्यासोबत सामाजिक व आर्थिक अधिकार, काम व शिक्षण मिळवून दिले. बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य व समानता स्थापित करण्याप्रती कटिबद्धतेने आज महिलांना शिक्षण पूर्ण करण्यास, विविध कार्यक्षेत्रांमध्ये प्रगती करण्यास आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास आत्मविश्वास दिला आहे. आमचा एपिसोड डॉ. ऑबेडकर यांनी महिलांना त्यांच्या अधिकारांसाठी लढण्यास कशाप्रकारे प्रेरित केले या बाबीला दाखवतो, जी आणखी एक महत्त्वपूर्ण सामाजिक समस्या आहे.”
पहा ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!