fbpx

खडकवासला धरण साखळी प्रकल्पात 8.70 टीएमसी पाणीसाठा वाढला

पुणे: शहरात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळूनbगेल्या २४ तासात ०.80 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. एकूण पाणीसाठा आता 8.70 टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान, या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या धरणांतील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
आज सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा पावणेआठ टीएमसीपर्यंत जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
प्रकल्पातील एकूण पाणीसाठा काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५.४५ टीएमसी इतका होता. त्यात गेल्या २४ तासांत आणखी ०.९१ टीएमसीची भर पडून तो आता ०.६७ टीएमसी इतका झाला आहे. खडकवासला प्रकल्पात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चार धरणे येतात. या सर्व धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता ही २९.१५ टीएमसी इतकी आहे. वरसगाव साठवण क्षमता १२.८२ टीएमसी, पानशेत धरणाची एकूण साठवण क्षमता १०.६५ टीएमसी, टेमघर धरणाची पाणी साठवण क्षमता ३.७१ टीएमसी आणि खडकवासला धरणाची पाणी साठवण क्षमता ४.६५ टीएमसी इतकी आहे.
प्रकल्पातील एकूण पाणीसाठा हा २ जुलै २०२२ ला २.५१ टीएमसी इतका कमी झाला होता. मात्र ३ जुलैपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने, दिवसेंदिवस पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
०८धरणनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • खडकवासला — १७
  • पानशेत — १२
  • वरसगाव — ७४
  • टेमघर — ०.२८
  • एकूण — ७४

Leave a Reply

%d bloggers like this: