fbpx

हिंजवडीच्या मंदिरात भजन, कीर्तनाने आषाढी एकादशी साजरी

पुणे : भंगारमालाच्या व्यवसायातील उद्योजक असलेल्या बाळूमावशी धुमाळ यांच्या माण-हिंजवडी-गवारवाडी खिंडीतील राम, कृष्ण, विठ्ठल मंदिरात १० ऑगस्ट रोजी आषाढी एकादशी निमित्त अभिषेक,भजन,कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त रांगोळया काढण्यात आल्या आणि प्रसाद वाटप करण्यात आले.

वारकरी संप्रदायातील बाळूमावशीनी विठ्ठल, रुक्मीणी, राम, श्रीकृष्ण, हनुमान , महादेव मंदिर उभारून तेथे प्रतिष्ठापना केली आहे. अशिक्षित असूनही श्रद्धेपोटी त्यांनी व्यवसायातून जमवलेली पुंजी खर्च करून हे मंदिर बांधले आहे.

त्या दर वर्षी तेथे हरिनाम सप्ताह करतात . स्वखर्चाने या परिसरातील दिंडी त्या हरिद्वार ,काशीला घेऊन गेल्या आहेत. आषाढी एकादशी निमित्त भाविकांची रीघ या मंदिरात लागली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: