fbpx

दलित पँथरचा अंगार पुन्हा निर्माण व्हावा – लक्ष्मीकांत देशमुख

पुणे : ज्या महाराष्ट्राने फुले ,शाहू ,आंबेडकर यासह देशाला अनेक महापुरुष दिले ,पुरोगामी विचार दिला ,दलीत पँथर दिली त्याच महाराष्ट्रात आज दलीत समाजावर मोठ्या प्रमाणत अन्याय – अत्याचार होत आहेत . त्याला रोखण्यासाठी आज दलीत पँथर सारखी चळवळ निर्माण होणे काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक ,अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले . दलीत पँथर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दलीत समाजात कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी देशमुख बोलत होते .
देशमुख पुढे म्हणाले की ,पँथर चा तो काळ आठवला की आज ही अंगावर शहारे उभे रहातात .कोठेही अन्याय अत्याचार झाले की त्याला न्याय देण्याचे आणि वाचा फोडण्याचे काम पँथर करायची .
दलीत पँथर चा तो झंझावात म्हणजे एक क्रांतीचा पर्व होता . दलीत पँथर चा आदर्श घेऊन आज गुजरात ,उत्तर प्रदेश ,बिहार यासारख्या राज्यात चळवळी व नेतृत्त तयार होत आहे पण ज्या महाराष्ट्राने पँथर निर्माण केली तिथे आज पुन्हा पँथर निर्माण व्हावी ही गरज निर्माण झाली आहे त्याचा आज सर्वांनी विचार करावा असे आवाहन लक्ष्मीकांत देशमुख यांनी यावेळी केले .
रमेश बागवे म्हणाले की ,दलीत पँथर ने आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार दिला ,स्वाभिमानाने जगायला शिकवले
फुले ,शाहू ,आंबेडकर , आण्णा भाऊ साठे यांचे विचार शिकवले .आजचा दलीत तरुण भरकटत आहे .राजकीय ,सामाजिक वाटचाल करताना आज दलीत पँथर चा आदर्श सर्वांनी अंगिकारला पाहिजे .तरच समाजाचा विकास होईल .असे ते म्हणाले .
या कार्यक्रमाचे आयोजक राहुल डंबाळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषण करताना दलीत पँथर चा इतिहास आणि आज हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील भूमिका सांगितली .आजच्या दलीत तरुणाला दलीत पँथर चा इतिहास आणि कार्य समजले पाहिजे ,त्यांना सामाजिक कार्यात पँथर चा आदर्श जपता यावा यामुळेच आज नव्या पिढीला आणि जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेत्यांना आज आम्ही पँथर गौरव पुरस्काराने सन्मानित करीत असल्याचे सांगितले .
यावेळी अविचल धिवार,आनंद वैराट ,दादासाहेब सोनवणे ,पंकज धीवाऱ ,यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पँथर गौरव पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख व माजी गृहमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते गौरविण्यात आले .यावेळी दलीत पँथर चळवळीचा
मुख्य स्तोत्र असणाऱ्या अर्जुन डांगळे ,ज.वी.पवार ,नामदेव ढसाळ ,राजा ढाले यांच्या क्रांतिकारी कवितांचे वाचन करण्यात आले .
पुरस्कार प्राप्त दलीत रंगभूमीच्या माध्यमातून विशेष योगदान देणारे अविचल धिवार म्हणाले की ,दलीत पँथर ने अनेक इतिहास निर्माण केले आहेत .त्याकाळी गावोगावी लीहले जायचे ,आपल्यावर अन्याय झाल्यास संपर्क साधा असे पँथर चे बोर्ड लागले जायचे .आज पुन्हा नव्याने समाजाने चिंतन करण्याची वेळ आली आहे .आतातरी सर्वांनी एकत्र या असे भावनिक आवाहन धीवार यांनी आपल्या भाषणातून केले .
जेष्ठ पॅंथर नेते तानसेन ननावरे यांनी तत्कालिन आंदलने, राजकीय सामाजिक घडामोडी यांचा आढावा घेवुन दलित पॅन्थर मुळे आरक्षणाची अंमलबजावणी व जातीय अत्याचार विरोधी ॲट्रोसीटी प्रतिबंध कायदा निर्माण झाला.
सदर प्रसंगी डॉ. लक्ष्मीकांत देशमुख ( मा. अध्यक्ष अ. भा. मराठी साहीत्य संमेलन ) यांचे हस्ते मा. तानसेनभाई ननावरे ( जेष्ठ पॅन्थर नेते , मा. रोहीदास गायकवाड ( जेष्ठ पॅन्थर नेते ), मा. रमेददादा बागवे ( मा. गृह राज्यमंत्री ) मा. अविचल धिवार ( उद्योजक व विचारवंत ), मा. बाप्पुसाहेब भोसले (दलित पॅन्थर ऑफ इंडिया ), जेष्ठ पॅन्थर अशोक पगारे व महिला पॅन्थर मा. शशिकलाताई वाघमारे यांचा पॅन्थर चळवळीतील योगदाना बद्दल पॅन्थर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यास माजी मंत्री रमेश बागवे ,राहुल डंबाळे,सुवर्णा डंबाळे ,अविचल धीवार,रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण ,विठ्ठल गायकवाड ,दादासाहेब सोनवणे ,आश्विन दोडके ,प्रा.सुहास नाईक ,आनंद वैराट,पंकज धीवार ,मिलिंद अहिरे यासह विविध सामाजिक संघटनाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: